www.24taas.com, वृत्तसंस्था, वेलिंग्टन
न्यूझीलंडविरुद्धची वन-डे सीरिज टीम इंडियानं आधीच गमावली आहे. त्याचप्रमाणे आयसीसी वन-डे रँकिंगमधील भारताचं साम्राज्यही खालसा झालं आहे. त्यामुळं सीरिजमधील किमान एकतरी वन-डे मॅच जिंकण्याचं लक्ष्य आता धोनीब्रिगेडसमोर असणार आहे.
टीम इंडिया परदेशात वन-डे सीरिज जिंकू शकत नाही हे न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आता या सीरिजमधील अखेरची वन-डे वेलिंग्टनमध्ये रंगणार आहे. त्यामुळं या मॅचमध्ये विजय मिळवण्यावर धोनी अँड कंपनीचं लक्ष्य असणार आहे. सीरिज गमावली असली तरी सीरिजचा शेवट विजयानं करावा यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असणार आहे.
बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांमध्ये धोनीच्या टीमला कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. बॉलर्सना किवी बॅट्समनना खोऱ्यानं रन्सकरण्यापासून रोखावं लागेलं. तर बॅट्समनना मोठा स्कोअर उभारून द्यावा लागणार आहे. विराट कोहली हे धोनीचं कुठल्याही मॅचमध्ये चालणाऱ्या ट्रम्प कार्डवर पुन्हा एकदा भारतीय बॅटिंगची मदार असेल.
धोनीनं विराटची बॅटिंग ऑर्डर चेंज करण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळं टीम इंडियात या मॅचमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. ईशांत शर्माला पुन्हा प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनाही आपला फॉर्म दाखवावा लागेल. स्पिनर्सना सीरिजमध्ये काहीच कमाल करता आलेली नाही. तर किवींची कामगिरी शानदार होतेय. त्यामुळं अखेरच्या वन-डेतही भारतीय टीमला धुळ चारण्यास त्यांची टीम आतूर असेल. आता भारतीय टीम अखेरची वन-डे जिंकत आपली प्रतिष्ठा कायम राखण्यात यशस्वी होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.