कोरीचे ३६ बॉलमध्ये शानदार शतक, आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडला

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या वन डेमध्ये ऑल राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३६ बॉलमध्ये १०१ रन्स केलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 1, 2014, 11:12 AM IST

www.24taas.com,वृत्तसंस्था ,ओटेगो
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या वन डेमध्ये ऑल राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३६ बॉलमध्ये १०१ रन्स केलेत.
आतापर्यंत जलद शतकाचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीचा होता. त्याने ३७ बॉलमध्ये शतक मारले होते. आफ्रिदीने १८ वर्षांपूर्वी हा विक्रम केला होता. अँडरसनने नाबाद १३१ रन्स केल्या आहेत. त्याने १४ उत्तुंग सिक्स आणि ६ फोर मारलेत.
अँडरसनने त्याचा पार्टनर रायडर बरोबर खेळताना विकेटव लक्ष केंद्रीत करताना चांगली खेळी केला. रायडरने ४६ बॉलमध्ये १०१ रन्स केल्यात. तिसऱ्या वडेमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कमाल करून दाखविली आहे. २१ ओव्हरमध्ये ४ विकेटच्या बदल्यात २८३ रन्सचा डोंगर उभा केला आहे. एंडरसने सर्वच बॉलरला सळो की पळो करून सोडले आहे.
वनडे सामन्यात पावताचा व्यत्यय आला. त्यामुळे २१ ओव्हरची मॅच खेळविण्यात आली आहे. २८३ रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची दमछाक झाली आहे. वेस्ट इंडीजने ३ विकेटच्या बदल्यात केवळ २२ रन्स केल्या आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.