www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर याची पुन्हा एकदा अंडर फोर्टीन संघात वर्णी लागलीय. ज्युनिअर तेंडुलकर म्हणून ओळखला जाणाऱ्या अर्जुन तेंडुलकर ‘अंडर फोर्टीन’च्या संभाव्य यादीतून वगळण्यात आलं होतं. परंतु, त्याला आता पुन्हा एकदा या संघात संधी मिळालीय.
संभाव्य ३० जणांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये अर्जुन तेंडुलकरचं नाव नव्हतं. यासंबंधी कारण देताना, निवड झालेल्या ३० खेळाडूंना मुंबईत वास्तव्याचा पुरावा सादर करणं आवश्यक होतं. यासाठी कमीत कमी एक वर्ष तर मुंबईत वास्तव्य करत असल्याचा पुरावा ग्राह्य धरला जाणार होता. परंतु, निवड झालेल्यांपैकी सात खेळाडू हा रहिवासी दाखल सादर करू शकले नाहीत. त्यामुळे या सात खेळाडूंना वगळण्यात आलंय.
या सात खेळाडूंच्या जागी संभाव्य खेळाडूंमधील वगळण्यात आलेल्या खेळाडूंना ही संधी देण्यात आली. यामध्येच अर्जुन तेंडुलकरलाही संधी मिळालीय. अर्जुनसहीत राखीव असणाऱ्या अर्जुन आणि अमन शर्मा, ऋषीकेश उगले, हाशीर दाफ्तर आणि सनथ नाक्ती या चार खेळाडूंना संभाव्य यादीत स्थान मिळालंय, अशी माहिती एमसीएनं दिलीय. यामुळे या खेळाडूंना वांद्रे-कुर्ला क्रीडासंकुलात होणाऱ्या शिबिरात सहभागी होता येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.