द्रविडच्या हस्ते ‘बॉर्न टू बॅट’चं प्रकाशन...

‘बॉर्न टू बॅट’ या पुस्तकाचं नुकतंच मुंबईत उद्घाटन झालंय. क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याच्या कारकीर्दीवर या पुस्तकात प्रकाश टाकलाय.

Updated: Nov 23, 2012, 04:25 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘बॉर्न टू बॅट’ या पुस्तकाचं नुकतंच मुंबईत उद्घाटन झालंय. क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याच्या कारकीर्दीवर या पुस्तकात प्रकाश टाकलाय.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच सचिन तेंडुलकर... आजपर्यंत असंख्य रेकॉर्ड आपल्या नावावर केलेल्या मास्टरच्या कारकिर्दीवर बरीच पुस्तकंही निघालीत. सचिनच्या क्रिकेटवर आणि त्याच्या कारकिर्दिवर जवळून प्रकाश टाकणाऱ्या अशाच एका पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. सचिन `बॉर्न टू बॅट` असं नाव असलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं ते टीम इंडियाची ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडच्या हस्ते... खालीद अन्सारी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राहुलनं सचिनबरोबरच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी राहुलनं केलेली सचिनची मिमिक्रीही भलतीच भाव खाऊन गेली आणि राहुलनं उपस्थितांच्या टाळ्याही मिळवल्या.