www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन
न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रँडन मॅक्क्युलम आणि विकेटकीपर बीजे वाटलिंग यांनी कसोटी सामन्यात भागीदारीचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, सहाव्या विकेटसाठी त्यांनी हा विक्रम केला आहे.
वाटलिंग आणि मॅक्क्युलमने सहाव्या विकेटसाठी ३५२ रन्स केल्या, या आधी श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने आणि प्रसन्ना जयवर्धने यांनी 351 धावांचं रेकॉर्ड केलं होतं.
हा रेकॉर्ड त्यांनी २००९मध्ये अहमदाबाद कसोटीत भारताविरोधात केला होता.
चहासाठी ब्रेक झाला तेव्हा १२४ धावांवर खेळणाऱ्या वाटलिंगला मोहम्मद शमीने बाद केलं.
चहाच्या ब्रेक आधी न्यूझीलंडने पाच विकेट गमावून ४४० धावा केल्या होत्या. तेव्हा न्यूझीलंडने १९४ धावांची आघाडी घेतली होती.
मॅक्क्युलमची ही सर्वोत्कृष्ट खेळी होती, तसेच मॅक्क्युलम आता एका मालिकेत डबल शतक ठोकणारा न्यूझीलंडचा दुसरा बॅटसमन ठरला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.