धोनीनंतर लगोलग चावलाही बाद, भारताच्या आठ विकेट

इंग्लंडविरुद्धच्या चार मॅचच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया २-१ नं पिछाडीवर आहे. आता नागपूर टेस्ट धोनी अॅन्ड कंपनीसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 15, 2012, 04:48 PM IST

www.24taas.com, नागपूर
महेद्रसिंग धोनीनंतर लगोलग पियुष चावलाही बाद झालाय. ही भारताची आठवी विकेट... चावला दोन बॉलमध्ये अवघा एक रन देऊन बाद झालाय. भारताची सध्याची स्थिती २९७/८ अशी आहे.
भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंगचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलंय. तो ९९ रन्सवर आऊट झालाय. ही भारताची सातवी विकेट ठरली. धोनीनं २४६ बॉ्ल्समध्ये ९९ रन्स केले. आता मैदानावर आर. अश्विन आणि पियुष चावला खिंड लढवत आहेत.
याअगोदर विराट कोहलीने नागपूर कसोटीत दमदार शतक ठोकल्यानंतर कोहलीही बोल्ड झालाय. २९५ बॉल्समध्ये १०३ रन्स करत त्यानं टेस्ट करिअरमधलं आणखी एका शतक झळकावलंय. या शतकात ११ चौकारांचा समावेश आहे. विराट बाद झाल्यानंतर धोनीला साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानावर दाखल झालाय.
इंग्‍लंडला चोख प्रत्‍युत्तर दिलंय. कोहलीने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत पावणेदोनशे धावांची अभेद्य भागीदारी करुन भारताचा डाव अडचणीतून बाहेर काढला. कोहलीने अतिशय संयमी खेळी केली. नेहमीपक्षा ही खेळी अतिशय जबाबदारीने परिपूर्ण होती.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी भारताची बाजू सावरली आहे. पहिल्या तीनही मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने उपहारानंतर अर्धशतक पूर्ण केले. आणि त्याला धोनीनेही चांगलीच साथ दिली. मात्र स्कोरबोर्डं अगदीच संथ गतीने हलतो आहे. त्यामुळे अजूनही टीम इंडियाची नामुष्की टळलेली नाही.
धोनीसोबत कोहलीने चांगली भागीदारी केली आहे. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली असून फॉलोऑन टाळला आहे. उपहाराला खेळ थांबला त्‍यावेळी भारताची 4 बाद 146 अशी स्थिती होती. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे पहिल्‍या सत्रामध्‍ये भारताने एकही विकेट गमाविली नाही. ही भागीदारी आणखी वाढविण्‍याचा दोघांचा प्रयत्‍न राहणार आहे.
इंग्लडच्या ३३० धावांचा पाठलाग करताना अवघ्या झटपट बाद झालेल्या चार फलंदाजामुळे भारतीय संघ चौथ्या आणि अंतीम कसोटीत अडचणीत आला आहे. सध्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून विराट कोहली ११ आणि कर्णधार धोनी ८ धावांवर खेळत आहे.
यापूर्वी भारताचे ७१ धावांवर भारताचे चार आघाडीचे फलंदाज तंबूत गेले आहे. सचिन तेंडुलकर २, सेहवाग शून्य गंभीर ३७ आणि पुजारा २६ धावा काढून बाद झाला.
गंभीर, सेहवाग आणि सचिनचा अडसर अंडरसनने दूर केला. सचिन आणि सेहवाग दोन्हीही त्रिफळाचित झाले. तर गंभीरने अंडरसनच्या गोलंदाजीवर प्रायरकडे झेल दिला. चेतेश्वर पुजारा पंचाच्या चुकीच्या निर्णयचा बळी ठरला. त्याच्या हाताला चेंडू लागला असताना मनगटाला लागल्याचे समजून त्याला बाद ठरविण्यात आले. पुजाराची विकेट स्वानने घेतली.

भारताला एक धावेवर पहिला झटका बसला. वीरेंद्र सेहवाग शून्यावर जिमी अंडरसन याचा शिकार झाला. सेहवागला अंडरसनने त्रिफळाचित केले.
यापूर्वी नागपूर कसोटीद्वारे पदार्पण करणाऱ्या जोसेफ रूटची घट्ट रूतलेली मूळे पियुष चावला याने उखडली. रूट याने ७३ धावांची शानदार खेळी केली. तर त्याने लगेच अर्धशतक करणाऱ्या ग्रॅम स्वानला पायचित केले. त्याने ५६ धावा केल्या. त्यानंतर जेमी अंडरसनाला बाद करता इंग्लडचा डाव ३३० धावांवर संपवला.

यापूर्वी नागपूर कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताने दोन फलंदाज झटपट बाद केले. आर. अश्विनने मॅथ्‍यू प्रायरचा त्रिफळा उडवून इग्‍लंडला सहावा धक्‍का दिला. प्रायरने 57 धावा केल्‍या. तर त्‍यानंतर इशांतने टीम ब्रेस्‍ननला शून्‍यावर पायचीत केले. अश्विनने विकेट घेतल्‍यानंतर त्‍याच्‍या जागी पुढचे षटक धोनीने इशांतला दिले. हा बदल फायदेशीर ठरला.
इंग्लडचा निम्मा संघ १३९ धावांत गारद झाल्यावर कसोटीत पदार्पण करणारा जे. रुट आणि विकेटकिपर फलंदाज मॅट प्रायर यांनी साठ धावांची नाबाद भागीदारी करून इंग्लडला दिवसअखेर ५ बाद १९९ अशा स्थिती आणून ठेवले आहे. दिवस संपला तेव्हा रूट ३१ तर प्रायर ३४ धावांवर खेळत आहे.
यापूर्वी कूक आणि कॉम्पटन बाद झाल्यावर ट्रॉटच्या साथीने इंग्लडचा डाव सावरणारा खतरनाक फलंदाज केवीन पीटरसनला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रवींद्र जडेजाने बाद केले आणि पीटरसनला बाद करत त्याने इंग्लडला पाचवा झटका दिला. पीटरसनने १० चौकारांसह ७३ धावा केल्या.
ट्रॉटनंतर पीटरसनला साथ देण्यासाठी मैदानावर उतरलेला इयान बेल झटपट तंबूत परतला. चावलाने टाकलेल्या चेंडूवर कोहलीने बेलचा झेल पकडला. बेल फक्त एक रन काढू शकला.
याअगोदर, नागपूरच्या टेस्ट मॅचद्वारे टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या जडेजानं टेस्ट क्रिकेटमध्ये शानदार एन्ट्री मिळवली. जडेजानं इंग्लं