अॅशेसवर इंग्लंड टीमची ‘लघूशंका’!

अॅशेस सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळं इंग्लंड ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिला आहे. इंग्लंडनं अॅशेस सीरिज ३-० नं जिंकली आहे. पण हे सगळं झाल्यावर इंग्लंड संघातील काही महाभागांनी अत्यंत हीन कृत्य केलं. कूक कंपनीच्या काही शिलेदारांनी ओव्हलच्या पीचवर लघवी करून आपल्या उन्मत्तपणाचं दर्शन घडवलं.

Updated: Aug 26, 2013, 04:58 PM IST

www.24taas.com झी मीडिया, लंडन
अॅशेस सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळं इंग्लंड ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिला आहे. इंग्लंडनं अॅशेस सीरिज ३-० नं जिंकली आहे. पण हे सगळं झाल्यावर इंग्लंड संघातील काही महाभागांनी अत्यंत हीन कृत्य केलं. कूक कंपनीच्या काही शिलेदारांनी ओव्हलच्या पीचवर लघवी करून आपल्या उन्मत्तपणाचं दर्शन घडवलं.
पाचव्या टेस्टच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३७७ रन्सवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं सामना जिंकण्याच्या उद्देशानं एकदिवसीय शैलीमध्ये क्रिकेट खेळत दुसरा डाव १११ धावांवर घोषित केला आणि इंग्लंडमध्ये विजयासाठी २७७ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं ५ बाद २०६ अशी मजल मारली आणि सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवलं. मात्र पाचवी टेस्ट जिंकून मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिला.
१९७७ नंतर अॅशेस मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाची ही सर्वात मोठी हार आहे. पाच सामन्यांपैकी ऑस्ट्रेलिया एकही सामना जिंकू शकलेला नाही. अॅशेस ३-० नं जिंकल्यानंतर इंग्लंडनं टेस्ट रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप घेतली आहे.
यंदाच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाची पुरती दैना उडवली. पहिले तीनही सामने जिंकूनच त्यांनी मालिकेवर कब्जा मिळवला होता. पण त्यांनी ही मालिका ०-३नं गमावली. स्वाभाविकच, इंग्लंडमध्ये आनंदाचा वातावरण तयार झाला आहे. क्लार्कसेनेचा फडशा पाडल्यानं कूक कंपनी भलतीच खुश होती. शॅम्पेन उडवून, नाचून, मैदानाला फेरी मारून ते हा आनंद साजरा करत होते.

मात्र आपल्या देशाच्या उज्ज्वल परंपरेचा, कडक शिस्तीचा, नसानसात भिनलेल्या व्यावसायिकतेचा आणि क्रिकेटवरच्या उदात्त प्रेमाचा टेंभा मिरवणाऱ्या इंग्लंडच्या काही क्रिकेटवीरांनी ओव्हल मैदानावर अत्यंत किळसवाणा `प्रताप` करून आपली लायकी दाखवून दिली आहे. कूक कंपनीच्या काही शिलेदारांनी ओव्हलच्या पीचवर लघवी करून आपल्या उन्मत्तपणाचं दर्शन घडवलं. ओव्हलच्या पीचवर त्यांनी लघवी केल्याचं वृत्त स्थानिक वेबसाईटनं दिलं आहे.
स्टुअर्ट ब्रॉड, केविन पीटरसन आणि जेम्स अँडरसन हे `सीनिअर` क्रिकेटपटू या कू-कर्मात आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. हा प्रकार क्रिकेटच्या महान परंपरेला काळीमा फासणारा असल्याची संतप्त प्रतिक्रिया मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.