इंडिया पराभवाच्या छायेत, टीम इंग्लंड`छाँ गयी`....

इंग्‍लंडविरुद्ध दुस-या कसोटीमध्‍ये भारतावर पराभवाचे सावट आले आहे. मॉन्‍टी पानेसर आणि ग्रॅहम स्‍वानच्‍या फिरकीने भारतीय फलंदाजीला गुंडाळून ठेवले.

Updated: Nov 25, 2012, 07:26 PM IST

www.24taas.com, मुंबई
इंग्‍लंडविरुद्ध दुस-या कसोटीमध्‍ये भारतावर पराभवाचे सावट आले आहे. मॉन्‍टी पानेसर आणि ग्रॅहम स्‍वानच्‍या फिरकीने भारतीय फलंदाजीला गुंडाळून ठेवले. दोघांनी भारतीय फलंदाज अक्षरशः नाचविले. तिस-या दिवसाचा खेळ संपला त्‍यावेळी भारताची 7 बाद 117 धावा, अशी अवस्‍था झाली होती. गौतम गंभीर एकटा एका बाजुने खिंड लढवित उभा होता. त्‍याने झुंझार अर्धशतक झळ‍क‍ाविले. भारताकडे 31 धावांची आघाडी आहे. त्‍यामुळे भारतीय संघ पराभवाच्‍या उंबरठ्यावर उभा आहे.
मुंबई टेस्टमध्ये इंग्लिश बॅट्समन्सच्या धडाक्यामुळे भारतीय बॉलर्सना घाम फुटला होता. मात्र, फिरकीने जादू करीत ४१३ वर इंग्लिश टीमला ऑलआऊट केली. ८६ रन्सची आघाडी घेली आहे. तर भारतीने दुसऱ्या डावाला सुरूवात केली असून वीरेंद्र सेहवाग ९ रन्सवर आऊट झाला. गौतम गंभीर १९ धावांवर खेळत आहेत. भारताने ३० रन्स केल्यात.
कॅप्टन कूक आणि पीटरसनच्या सेंच्युरीमुळे इंग्लंड टीमची टेस्टवरील पकड मजबूत केली होती. कुकने १२२, कॉमटन २९, थ्रोट ०, पीटरसर १८६, समित पटेल २६ रन्स केल्यात पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडमे टीम इंडियावर लीड घेतली. पीटरसनला वेध लागले होते डबल सेंच्युरीचे. मात्र, त्याला १८६ वर आऊट करण्यात भारताला यश मिळाले. दरम्यान प्रग्यान ओझाने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवत ५ इंग्लिश बॅट्समन्सना पॅव्हिलियनमध्ये धाडलं तर अश्विनला एक विकेट घेण्यात यश आलं.
समित पटेलच्या रूपात इंग्लंडला ३५७ रन्सवर पाचवा धक्का बसला. वर्षभरापेक्षा अधिक काळानंतर टीम इंडियात कमबॅकर करणारा ऑफस्पिनर हरभजन सिंग निष्प्रभ ठरला. पीटरसन आणि समित पटेल या जोडीने आक्रमक बॅटींग केली. त्याआधी कर्णधार ऍलिस्ट्र कूक आणि स्टार फलंदाज केविन पीटरसन यांनी भारतीय गोलंदाजीला फोडून काढत झुंझार शतके ठोकली. दोघांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंड दुस-या कसोटीमध्येा सुस्थितीत आहे. अखेर ही जोडी फोडण्यायत भारताला यश मिळाले आहे. आर. अश्विनने कुकला बाद केले. कुक १२२ धावांवर बाद झाला. त्यानंतर लंचपूर्वी भारताला चौथे यश मिळाले. जॉनी बेरस्टोधव १५ धावा काढून बाद झाला. लंचला इंग्लंणडने २९८ धावांपर्यंत मजल मारली होती.
दरम्यान, पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया ३२७ रन्सवर ऑलआऊट झाली. चेतेश्वर पुजारानं १३५ रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं आर. अश्विनबरोबर १११ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली. अश्विनं ६८ रन्स करत पुजाराला चांगली साथ दिली. मॉन्टी पानेसरने पाच तर ग्रॅमी स्वानने चार विकेट्स घेतल्या.
इंग्लिशटीमच्या स्पिन मा-यासमोर टीम इंडियाच्या दिग्गज बॅट्समनचं काहीच चाललं नाही. पानसेर-स्वान या स्पिन जोडीसमोर भारतीय बॅटिंग अक्षरक्ष: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. चेतेश्वर पुजाराच्या झुंजार इनिंगमुळेच भारताला ३२७ रन्सपर्यंत मजल मारता आली.