इंग्लंडला फॉलोऑन, ओझाचे पाच बळी

अहमदाबाद टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडची अवस्था अगदीच दयनीय करून टाकली आहे. स्पिनर्सचा सामना करताना इंग्लंडची चांगलीच धांदल उडाली आहे.

Updated: Nov 18, 2012, 06:38 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
भारताने फॉलोऑन लादल्‍यानंतर इंग्‍लंडचा कर्णधार एलिस्‍टर कूक आणि निक कॉम्‍प्‍टन ही सलामीची जोडी पाय रोवून खेळपट्टीवर उभी आहे. दोघांनी सुरुवातीची काही षटके अतिशय संथपणे खेळून काढत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. प्रग्‍यान ओझाचे 5 बळी आणि आर. अश्विनच्‍या 3 विकेट्सच्‍या जोरावर भारताने इंग्‍लंडचा डाव 191 धावांमध्‍ये संपविला.
अहमदाबाद टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडची अवस्था अगदीच दयनीय करून टाकली आहे. स्पिनर्सचा सामना करताना इंग्लंडची चांगलीच धांदल उडाली आहे. भारताने पहिला सत्रातच ४ विकेट मिळवून इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं आहे.
इंग्‍लंडचे 7 फलंदाज तंबुत परतले असून फॉलोऑनचे दाट सावट संघावर आहे. फॉलोऑन टाळण्‍यासाठी इंग्‍लंडला 321 धावा काढायच्‍या आहेत. हा टप्‍पा आता जवळपास आवाक्‍याबाहेर गेला आहे.
प्रग्‍यान ओझाने इंग्‍लंडला लागोपाठच्‍या चेंडुंवर दोन मोठे धक्‍के इंग्‍लंडला दिले. सर्वप्रथम केविन पीटरसनचा त्‍याने अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडविला. तर दुस-याच चेंडूवर इयन बेल बाद झाला. सचिन तेंडुलकरच्‍या हाती झेल देऊन तो परतला.
भारतीय फिरकी मोडू पाहणा-या केविन पीटरसनचा अडथळा ओझाने दूर केला. ओझाने त्‍याचा त्रिफळा उडविला. पीटरसनने 17 धावा काढल्‍या. तर पुढच्‍याच चेंडुवर ओझाला मिड ऑफवरुन मोठा फटका मारण्‍याच्‍या प्रयत्‍नात बेल बाद झाला.