युसूफचा आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम

आयपीएलमध्ये यूसुफ पठाणने नवा विक्रम केला आहे. युसूफने अवध्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.

Updated: May 26, 2014, 01:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
आयपीएलमध्ये यूसुफ पठाणने नवा विक्रम केला आहे. युसूफने अवध्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.
कोलकाताच्या इडन गार्ड्न्सवर सनरायझर्स हैदराबाद विरोधातील सामन्यात पठाणने हा विक्रम केला आहे

एवढंच नाही पठाणने २२ चेंडूत ७२ धावांची जबरदस्त खेळी केलीय. पठाणच्या खेळीने केकेआरला मोठा विजय मिळाला आहे.
पठाणने अवघ्या १५ बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केल्याने अॅडम गिलख्रिस्ट तसंच ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निकाला आहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध सेन्च्युरियन पार्क या ठिकाणी २००९मध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये गिलख्रिस्टने 17 चेंडूत अर्धशतक झळकवलं होतं, तर २०१२ मध्ये गेलनेही 17 चेंडूत अर्धशतक साजर केलं होतं.
गेलने ही जबदस्त खेळी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पुणे वॉरिअर्सविरोधात केली होती.

सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची पठाणने चाळण केली, हा क्षण पाहण्यासारखा होता. पठाणने परवेझ रसूलच्या एका ओव्हरमध्ये २२ केल्या. त्यानंतर आणखी जलदगती गोलंदाज डेल स्टेनचा त्याने समाचार केला. स्टेनच्या एका ओव्हरमध्ये पठाणने २५ धावा केला.
पठाणचा या खेळीत स्ट्राईक रेट ३२७.२७ होता, हा रेट आयपीएलमध्ये कमी बॉल्समध्ये अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वोत्कृष्ट मानला गेला आहे.

आयपीएलमध्ये युसूफ पठाणने २ हजार धावाही पूर्ण केल्यात. युसूफने आतापर्यंत १०४ सामन्यात २०३२ धावा केल्या आहेत.

हा तडाखेबाज फलंदाज आणखी काही रेकॉर्ड मोडीत काढेल, अशी शक्यता आहे कारण आयपीएलमध्ये चौदा वेळा आणि टी-२० क्रिकेटमध्ये एकूण पंधरा वेळा `मॅन ऑफ द मॅच`चा पुरस्कार पठाणने पटकावला.
सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा `मॅन ऑफ द मॅच` होण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलला पंधरा वेळेस `मॅन ऑफ द मॅच`चा सन्मान मिळाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.