क्रिकेटसाठी सर्वात मोठा धोका आयपीएल

भारतात होणारी आयपीएल स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने सर्वात मोठा धोका असल्याचे खळबळजनक वक्तव्य वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार कार्ल हूपर यांनी केले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 10, 2012, 02:38 PM IST

www.24taas.com, मेलबर्न
भारतात होणारी आयपीएल स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने सर्वात मोठा धोका असल्याचे खळबळजनक वक्तव्य वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार कार्ल हूपर यांनी केले आहे. क्रिकेटसाठी जे काही धोके आहेत, त्यात सर्वात मोठा धोका आयपीएल असल्याचे हूपरने ‘द अडव्हायझर’शी बोलताना सांगितले.
वेस्ट इंडिज बोर्डाने करार बद्ध केले नाही तर टी- २० विश्व चषक जिकणारा वेस्ट इंडिजचा संघही या धोक्यामुळे भरकटू शकतो. गेल्या काही दिवसापासून सुपरस्टार सलामीचा फलंदाज आणि इतर खेळाडूंचे वेस्ट इंडिज बोर्डाची वाद सुरू होता. फिरकी गोलंदाज सुनिल नरेन आणि ड्वेन ब्रावो यांनी आयपीएलसाठी टेस्ट क्रिकेट खेळणे सोडले होते.
प्रेक्षक सर्वश्रेष्ठ खेळाडूला खेळताना पाहू इच्छितात, गेल आणि इतर स्टार खेळाडू खेळे नाहीत तर मॅच कोण पाहणार असा सवालही हूपर यांनी केला आहे.

त्यामुळे आमच्या आघाडीच्या खेळाडूंना संघात जागा मिळण्यासाठी आणि करारबद्ध होण्यासाठी वेस्ट इंडिज बोर्डाने काही पाऊले उचलली पाहिजेत. सुनील नरेन सारख्या खेळाडूंना करारबद्ध केले तर ते आयपीएल ऐवजी देशाकडून खेळतील, असेही हूपर यांनी नमूद केले आहे.