www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएलच्या सर्व पाच हंगामात येथे खेळाडू आपल्या खेळापेक्षा पार्टयांमध्ये हॉट मॉडेल्स आणि नशेत तर्रर्र झालेले दिसून येतात. मैदानावरील परफॉर्मन्स पेक्षा त्यांचा या पार्ट्यांमधील थिल्लरपणाच जास्त दिसून येतो.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या पाच हंगामात या पाटर्यांमधून मॅच फिक्स करणा-या बुकींनीही आपला खास अड्डा बनवला होता. ही एकमेव अशी जागा होती की, जिथे मॅच संपल्यानंतर हे सर्व खेळाडू एकाच ठिकाणी येतात. आणि या सर्वांशी कोणीही सहज बोलू शकतो. यापासून धडा घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल ६ पासून मॅचनंतर होणा-या पार्टीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
या हंगामात काही मोजक्या मॅचनंतर पार्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ मे रोजी झालेल्या राजस्थान आणि पंजाब मॅचनंतर चंदीगड येथील एका हॉटेलमध्ये पार्टी झाली. त्याशिवाय आणखी एक पार्टी कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या मॅचनंतर आयोजित करण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.