वेस्ट इंडिजला मिळणार दुसरा ब्रायन लारा!

आगामी काळामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला आणखी एक ब्रायन लारा मिळण्याची शक्यता आहे. १४ वर्षीय एका कॅरेबियन मुलानं सेकेंडरी स्कूल क्रिकेटमध्ये ३५ ओव्हरमध्ये तब्बल ४०४ रन्सची धुवाधार बॅटिंग केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 21, 2014, 10:14 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, वेस्ट इंडिज
आगामी काळामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला आणखी एक ब्रायन लारा मिळण्याची शक्यता आहे. १४ वर्षीय एका कॅरेबियन मुलानं सेकेंडरी स्कूल क्रिकेटमध्ये ३५ ओव्हरमध्ये तब्बल ४०४ रन्सची धुवाधार बॅटिंग केली.
क्रिस्टन कालीचरण नावाच्या या विद्यार्थ्याच्या खेळीनंतर त्याची तुलना ब्रायन लारा सोबत केली जात आहे. कालीचरणनं ही कमाल विष्णू बॉइज हिंदू कॉलेजच्यावतीन वॅलेंलिया हायस्कूल विरोधात मॅच दरम्यान केली. ही मॅच सेकेंडरी स्कूल क्रिकेट लीगच्या अंडर-१४ क्वॉर्टर फायनल मॅच होती.
कालीचरणची बॅटिंग किती धुव्वांधार होती हे त्यानं केलेल्या ४०४ रन्सच्या आकड्यावरून कळून येतं. ४०४ रन्समध्ये त्यानं ४४ चौकार आणि ३१ षटकारही मारले. याच मॅचमध्ये विष्णू हायस्कूलनं ३५ ओव्हरमध्ये १ विकेट गमावून ५४८चा स्कोअर उभा केला. त्याला उत्तर देतांना वॅलेंसिया टीमनं ४२व्या ओव्हरपर्यंत अवघे ८९ रन्स बनवले आणि पूर्ण टीम ऑलआऊट झाली. कालीचरणच्या टीमनं विष्णू हायस्कूलनं ४५९ रन्सनं मॅच जिंकली.
कालीचरणही खेळी पाहून खूश झालेल्या त्रिनिदाद अँड टोबॅगोचे स्पोर्ट्स मिनिस्टर अनिल रॉबर्ट्सनं म्हटलं की, आम्हाला कदाचित नविन ब्रायन लारा मिळाला आहे. एका वृत्तपत्रानं रॉबर्ट्सच्या माध्यमातून लिहिलं की,“या प्रकारची जादूई खेळी खेळण्यासाठी शारीरिक मजबूती किंवा स्किल्सचीच गरज नाही तर अशा खेळीसाठी मानसिक संतुलनही चांगलं लागतं.”
रॉबर्ट्सनं सांगितलं, “या मॅचमध्ये खेळले गेलेले ड्राइव्ह आणि स्ट्रोकनं मला ८०व्या दशकातील फातिमामध्ये ब्रायन लाराच्या खेळीची आठवण करून दिली. लारा यांची बॅटिंग एका विद्यार्थ्याप्रमाणे पाहिली होती आणि आता एका मंत्र्याप्रमाणे. कालीचरणची बॅटिंग पाहता हे संकेत मिळतायेत की, आगामी काळात क्रिकेटच्या इतिहासात सर्वात महान क्रिकेटपटू बनण्याची क्षमता आहे.”

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.