`युवी, विजय माल्याकडून खेळू नकोस...`

युवराज सिंग आयपीएलच्या सातव्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. युवीला संघात घेण्यासाठी `रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू`नं १४ कोटी मोजूनत. मात्र, विजय माल्यांच्या `किंगफिशर` या कंपनीत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांनी एक खुलं पत्र लिहून युवीला `रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू`तर्फे न खेळण्याचं आवाहन केलंय.

Updated: Feb 14, 2014, 05:08 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
युवराज सिंग आयपीएलच्या सातव्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. युवीला संघात घेण्यासाठी `रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू`नं १४ कोटी मोजलेत. मात्र, विजय माल्यांच्या `किंगफिशर` या कंपनीत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांनी एक खुलं पत्र लिहून युवीला `रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू`तर्फे न खेळण्याचं आवाहन केलंय.

काय लिहिलंय किंगफिशर कर्मचाऱ्यांनी या पत्रात...
प्रिय युवराज,
आम्ही सारे किंगफिशर एयरलाइन्सचे कर्मचारी तुझे फॅन आहोत. जेव्हा तुला कॅन्सर झाला त्यावेळी साऱ्या देशवासियांप्रमाणे आम्हीदेखील तुझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. तू बरा झालास आणि पुन्हा फॉर्ममध्ये आलास, हे पाहून आम्हीही आनंद व्यक्त केला.
विजय माल्यांनी तुला १४ कोंटींना खरेदी केलंय... पण, त्यांचीच कंपनी असलेल्या कर्मचाऱ्यांनी गेल्या १८ महिन्यांपासून हक्काचा पगारदेखील मिळालेला नाही. आता आमची बँकेतली सारी सेव्हिंगही संपत आलीय. आम्ही सारे कर्जाच्या ओझ्याने पार कोलमडलो आहोत. प्रॉपर्टी, सोनं यावर कर्ज काढून आम्ही सध्या आमची गुजराण करत आहोत. काहिंना तर बेकारीमुळे झोपडपट्ट्यांमध्ये आश्रय घ्यावा लागतोय.
माल्यांकडे आमचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत... आयपीएल, कॅलेंडर, फॉर्म्युला वन या शौकीसाठी मात्र त्यांच्या बक्कळ पैसा आहे. असा निर्दयी व्यक्तीसोबत काम करावं की नैतिकदृष्ट्या या व्यक्तीपासून दूर रहावं, हा निर्णय सर्वस्वी तुझाच असेल`.
विजय माल्या खोटं बोलत असल्यामुळे किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांनी युवराजला आवाहन करत असल्याचं म्हटलंय. विजय माल्यांनी कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केलाय. त्यामुळे युवीनं आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून काय तो निर्णय घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया किंगफिशरमध्ये काम करणाऱ्या पुजानं व्यक्त केलीय. तर `युवराजने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून विजय माल्यांबरोबर काम करू नये` असं आवाहन अंजन कुमार देवेश्वर या किंगफिशरच्या माजी कर्मचाऱ्यानं युवीला केलंय.
आता प्रतिक्षा आहे ती युवी याबद्दल काय निर्णय घेणार याची?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.