14 फोर, 1 सिक्स... सिमंसची शतकी खेळी हीट!

‘आयपीएल सीझन-7’मध्ये काल लेंडिल सिमंसची शतकीय खेळी पाहायला मिळाली. सिमंसनं ‘आयपीएल-7’ चं पहिलं-वहिलं शतक ठोकलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 22, 2014, 06:24 PM IST

www.24aas.com, झी मीडिया, मोहाली
‘आयपीएल सीझन-7’मध्ये काल लेंडिल सिमंसची शतकीय खेळी पाहायला मिळाली. सिमंसनं ‘आयपीएल-7’ चं पहिलं-वहिलं शतक ठोकलंय.
मोहालीमध्ये झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात मुंबईनं पंजाबला सात विकेटनं मात दिली. मुंबईला हे सहजशक्य झालं ते केवळ सिमंसच्या नाबाद शतकी खेळीमुळे... ही मॅच जिंकल्यामुळे मुंबई इंडियन्सनं प्लेऑफमध्ये पोहचण्याची आपली आशा कायम ठेवल्यात.
आयपीएल-7मध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या लेंडिल सिमन्सनं दमदार बॅटींग करत 61 बॉल्समध्ये 100 रन्सची किमया करून दाखवली. यानंतरही तो नाबाद राहिला. या खेळीत त्यानं 14 फोर आणि 1 सिक्सर ठोकला. त्यामुळेच टॉप-4 मध्ये पोहचणं मुंबईला अजूनही शक्य वाटतंय.
‘आयपीएल’मध्ये पहिलं शतक ठोकण्याचा पराक्रम केला तो ब्रँडन मॅक्युलमनं... तर भारतीय क्रिकेटर्समध्ये ही किमया पहिल्यांदा साध्य करून दाखवली होती... ती मनीष पांडे या नवख्या तरुणानं...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.