आयपीएल क्रिकेट - मुंबई इंडियन्सची कोटींची बोली

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्स टीममध्ये खेळणार आहेत. इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) सहाव्या मोसमासाठी क्रिकेटपटूंच्या लिलावाला चेन्नईमध्ये सुरुवात झालीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2013, 06:08 PM IST

www.24taas.com,चेन्नई
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्स टीममध्ये खेळणार आहेत. इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) सहाव्या मोसमासाठी क्रिकेटपटूंच्या लिलावाला चेन्नईमध्ये सुरुवात झालीय.
ऑस्ट्रेलियाचे आजी-माजी कर्णधार रिकी पॉंटिंग आणि मायकल क्लार्कला अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स संघाने विकत घेतले आहे. लिलावात रिकी पॉन्टिंगला मुंबई इंडियन्सनं २ कोटी १० लाख रुपयांना विकत घेतलंय. त्यामुळे सचिनच्या कप्तानीत आता पॉन्टिंग खेळणार आहे. तर मायकल क्लार्कला पुणे वॉरियर्सनं बोली लावली आहे.
यंदाची सर्वाधिक बोली ग्लेन मॅक्सवेलला लागलीय. त्याला मुंबई इंडियन्सनं ५ कोटी ३० लाखांना विकत घेतलं. तर मुंबईकर अभिषेक नायरला पुणे वॉरियर्सने ३.५ कोटींना विकत घेतले आहे. पुण्याने २.१ कोटी रुपये मोजून क्लार्कला विकत घेतले. भारताचा तेज गोलंदाज आर.पी.सिंगला रॉयर्ल चॅलेंजर्स बंगळुरुने २.१२ कोटी रुपयांना विकत घेतले. दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जोहान बोथाला दिल्ली डेअरडेव्हिल्सने सर्वाधिक २.३९ कोटी रक्कमेला विकत घेतले आहे.

मॉईसेस हेनरिक रॉयल चँलेंजर्सन बंगळुरुने विकत घेत त्याला तीन लाख डॉलरला बोली लावली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलला मुंबई इंडियन्सने १० लाख डॉलर तर राजस्थान रॉयल्सने जेम्स फॉल्कनेरला चार लाख डॉलरना विकत घेतले आहे.
कोणाला किती बोली?
- ग्लेन मॅक्सेवल (मुंबई इंडियन्स) - १० लाख डॉलर
- रिकी पाँटिंग - (मुंबई इंडियन्स) - ४ लाख डॉलर
- फिल ह्युजेस - (मुंबई इंडियन्स) - १ लाख डॉलर
- जेकब ओरम - (मुंबई इंडियन्स) - ५० हजार डॉलर
- नॅथन कोल्टर-नाईल (मुंबई इंडियन्स) - ४.५० लाख डॉलर
- आरपी सिंह - (रॉयल चॅलेंजर्स) - ४ लाख डॉलर
- मायकल क्लार्क - (पुणे वॉरियर्स) - ४ लाख डॉलर
- अभिषेक नायर - (पुणे वॉरियर्स) - ६.७५ लाख डॉलर
- थिसरा परेरा - (सन रायजर्स) - ६.७५ लाख डॉलर
- डॅरेन सॅमी - (सन रायजर्स) - ४.२५ लाख डॉलर
- जेसी रायडर - (दिल्ली डेअरडेव्हिल्स) - २.६ लाख डॉलर
- मॉसेस हन्रिक्स - (रॉयल चॅलेंजर्स) - ३ लाख डॉलर
- जेम्स फॉल्कनर - (राजस्थान रॉयल्स) - ४ लाख डॉलर
- ल्युक पॉमर्सबॅच - (किंग्ज इलेव्हन) - ३ लाख डॉलर
- जोहान बोथा - (दिल्ली डेअरडेव्हिल्स) - ४.५ लाख डॉलर
- जयदेव उनाडकत -(रॉयल चॅलेंजर्स) - ५.२५ लाख डॉलर
- पंकज सिंग (रॉयल चॅलेंजर्स) - १.५ लाख डॉलर
- रवी रामपॉल (रॉयल चॅलेंजर्स) - २.९ लाख डॉलर
- मनप्रीत गोनी (किंग्ज इलेव्हन) - ५ लाख डॉलर
- फिडेल एडवर्डस - (राजस्थान रॉयल्स) - २.१ लाख डॉलर
- सुदीप त्यागी - (सन रायजर्स) - १ लाख डॉलर
- डर्क नॅनेस - (चेन्नई सुपरकिंग्ज) - ६ लाख डॉलर
- नॅथन मॅक्युलम (सन रायजर्स) - १ लाख डॉलर
- अजंता मेंडिस (पुणे वॉरियर्स) - ७.२५ लाख डॉलर
- ख्रिस्तोफर बार्नवेल (रॉयल चॅलेंजर्स) - ५० हजार डॉलर
- सुचित्र सेनानायके (नाईट रायडर्स) - ६.२५ लाख डॉलर
- ख्रिस मॉरीस - (सुपर किंग्ज) - ६.२५ लाख डॉलर
- जीवन मेंडीस (दिल्ली डेअरडेव्हिल्स) - ५० हजार डॉलर
- बेन लाफलिन (सुपर किंग्ज) - २० हजार डॉलर
- केन रिचर्डसन (पुणे वॉरियर्स - ७ लाख डॉलर
- डॅन ख्रिस्तियन (रॉयल चॅलेंजर्स) - १ लाख डॉलर
- क्लिंट मॅके (सन रायजर्स) - १ लाख डॉलर
- अकिला धनंजय (सुपर किंग्ज) - २० हजार डॉलर
- जेसन होल्डर (सुपर किंग्ज) - २० हजार डॉलर
- रायन मॅकलेरन (नाईट रायडर्स) - ५० हजार डॉलर
- कुसाल जनिथ परेरा (राजस्थान रॉयल्स) - २० हजार डॉलर