हेमिल्टन वन डे सामन्यातही भारताचा पराभव

हेमिल्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही न्यूझीलंडने भारताला हरवलं आहे. पाच मालिकेच्या या सामन्यात न्यूझीलंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

Updated: Jan 22, 2014, 04:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, हेमिल्टन
हेमिल्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही न्यूझीलंडने भारताला हरवलं आहे. पाच मालिकेच्या या सामन्यात न्यूझीलंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे.
पावसामुळे सामना २२ षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी केली, ४२ षटकात, ७ बाद २७१ धावा केल्या.
डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताला ४२ षटकांत २९७ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. भारताने ९ विकेट बाद २७७ धावा केल्या, तेव्हा पुन्हा पावसाला सुरूवात झाली, यावेळी तीन बॉल शिल्लक होते.
मात्र अम्पायरने सामना संपल्याची घोषणा केली आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताचा १५ धावांनी पराभव झाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.