www.24taas.com,झी मीडिया, लंडन
वेस्ट इंडिजचा आघाडीचा खेळाडू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा खेळायला येणार असेल तर मला झोपच लागत नसे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा लाराच महान खेळाडू आहे, असे मत रिकी पॉंटिंग यांने व्यक्त केलं आहे. सचिनपेक्षा लाराच टीमसाठी महत्वाचा खेळाडू ठरला आहे, असे रिकी म्हणतो.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये लाराच उत्कृष्ट खेळाडू असल्याचे म्हटले आहे. सचिनपेक्षा लाराने स्वतःच्या संघाला जास्त विजय मिळवून दिले आहे. ही वस्तुस्थिती आहे. सचिन आणि लारा हे दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असताना दुसऱया दिवशी लारा फलंदाजीला येणार असल्यास मला रात्रभर झोप लागायची नाही. मात्र, सचिनच्या बाबतीत तसे कधी घडले नाही, असे रिकीने स्पष्ट केलं.
लाराला आऊट करणे कठिण असते. मात्र, सचिनला मैदानावर रोखायचे ठरवल्यास तुम्हाला पर्याय सापडू शकतो. पण, लारा अवघ्या अर्धा तासात सामन्याचा रंगच पालटायचा. सामना संघाच्या दिशेने खेचून आणायचा. स्वतः किती शतके केली, हे माझ्यासाठी कधीच महत्त्वाचे नव्हते, अशी खोचक टीका रिकीने सचिनवर केली.
सचिन-लाराची तुलना करताना रिकीने सांगितले, तुमच्यामुळे संघाने किती सामने जिंकले आणि किती मालिका खिशात घातल्या, हेच जास्त महत्त्वाचे आहे. सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेत पहिल्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवले असले, तरी ही मालिका ऑस्ट्रेलिया २-१ने नक्की जिंकेल, असा विश्वास रिकीने व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.