www.24taas.com, झी मीडिया, तिरूवनंतपूरम
भारतीय क्रिकेट टीमचा माजी सुपरफास्ट बॉलर आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये झालेल्या अटकेनंतर बाहेर पडलेला एस. श्रीसंत गुरूवारी सकाळी लग्नाच्या बेडीत अडकला. जयपूरच्या शाही घराण्यातील ज्वेलरी डिझायनर भुवनेश्वर हिच्यासोबत केरळच्या प्रसिद्ध गुरुयावून श्रीकृष्ण मंदिरात पार पडला.
विवाहपूर्वीचे सगळ्या रिती बुधवारी एका खाजगी हॉटेलमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत काल पार पाडले गेले.
भुवनेश्वरी आठ डिसेंबर रोजी आपल्या कुटुंबीयांसहीत आणि नातेवाईकांसहीत इथं दाखल झाली होती. भुवनेश्वरी आणि श्रीसंत गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर आणि त्याला अटक झाल्यानंतरदेखील भुवनेश्वरीनं श्रीसंतची सोबत सोडली नव्हती.
श्रीसंतच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर श्रीसंत आणि त्याची पत्नी एर्नाकुलम जिल्ह्यातील कोठमंगलमस्थित श्रीसंतच्या घरी जाणार आहेत. यापूर्वी लग्नानंतर कोच्चीमध्येच गुरुवारी एक स्वागत समारंभही आयोजित केला गेलाय.
आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर आरोपी श्रीसंतला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळण्यापासून बंदी घातलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.