www.24taas.com, चेन्नई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरला कसोटी कारकिर्दीतील ५२ वे शतक पूर्ण करू शकला नाही. सचिन नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर ८१ रन्सवर बोल्ड झाला.
तिसऱ्या दिवशी सचिन शतक पूर्ण करेल, या आशेने क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमवर गर्दी केली होती. सचिनने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची निराशा केली. दुसऱ्या दिवसअखेर ७१ रन्सवर खेळत असलेल्या सचिनने केवळ १० रन्सची भर टाकली. सचिन ८१ धावांवर असताना ऑफस्पिनर लिऑनच्या गोलंदाजीवर चकला आणि त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडू थेट यष्टीवर येऊन आदळला.
सचिनने आजच्याच दिवशी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात २०० धावा करत विक्रम नोंदविला होता. त्यामुळे आजही तो शतक झळकावेल अशी आशा होती ती फोल ठरली.