IPL स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीनिवासनच्या चौकशीचे आदेश

सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना धक्का दिलाय. आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 18, 2014, 07:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना धक्का दिलाय. आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारण्याचा अर्जही सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलाय. जोपर्यंत आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणातील सर्व आरोपांतून त्यांना क्लीनचीट मिळत नाही तोपर्यंत श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळू शकणार नाही, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
बीसीसीआयची स्वायत्ता अबाधीत राखण्यासाठी श्रीनिवासन यांच्यासह १३ जणांची चौकशी करताना ती बीसीसीआयद्वारे स्थापन केलेल्या समितीद्वारेच करण्यात यावी, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.