धोनीने दिली होती श्रीसंतला धमकी

भारतीय क्रिकेटर श्रीसंतच्या वडिलांनी मॅच फिक्सिंगमध्ये फसवलं आहे असा आरोप केला. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन यांना जबाबदार ठरवलं आहे.

Updated: May 16, 2013, 01:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय क्रिकेटर श्रीसंतच्या वडिलांनी मॅच फिक्सिंगमध्ये फसवलं आहे असा आरोप केला. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन यांना जबाबदार ठरवलं आहे. त्यांनी एका स्थानिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. धोनीने श्रीसंत याला त्याचे करिअर संपविण्याची धमकीही दिली होती. आणि त्यामुळेच मॅच फिक्सिंगच्या आरोपामध्ये त्याला फसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी धोनीवर केला आहे. त्यामुळे आता धोनी आणि हरभजन याबाबत काय बोलणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
के. श्रीसंत याचे करिअर संपविण्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गोलंदाज हरभजन सिंग या दोघांचा हात आहे, असा आरोप श्रीसंत याच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची आहे. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आलीये.
फास्ट बॉलर श्रीसंत याला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तर त्याचसोबत राजस्थान रॉयलच्या अंकीत चव्हाण आणि अजित चंडालिया या खेळांडूंव्यतिरीक्त सात बुकिंना अटक करण्यात आलीये. तर अन्य दोन बुकी फरार झाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.