सर रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज

तिरंगी मालिका आणि चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयानंतर रवींद्र जडेजा टीम इंडियाचा हिरो बनला आहे. तसेच या वर्षातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकली असता तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 16, 2013, 04:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तिरंगी मालिका आणि चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयानंतर रवींद्र जडेजा टीम इंडियाचा हिरो बनला आहे. तसेच या वर्षातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकली असता तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
जडेजाने या वर्षात १७ वन डे सामने खेळले, त्यात त्याने १६.५१ च्या सरासरीने ३३ विकेट पटकावले. त्यामुळे कामगिरीमुळे तो या वर्षातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जड़ेजाने भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. जडेजाने स्पर्धेच्या ५ सामन्यात ३.७५ च्या इकॉनॉमी रेटने १२ विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला गोल्डन बॉलचा पुरस्कार मिळाला.
तसेच या शानदार कामगिरीमुळे त्याने वन डेमध्ये चांगली रँकिंग मिळवली आहे. तो गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या त्याचा क्रमांक पाचवा आहे. तो रँकिंगनुसार भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
तिरंगी मालिकेत जडेजाने चांगली कामगिरी करून मोठ्या स्कोअरच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या श्रीलंकेला गुडघे टेकावे लागले. फायनलमध्ये जडेजाने २३ धावा देऊन ४ विकेट घेतल्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.