सलमान खान आणि सनी देओल भिडणार

 बॉलिवूडच्या 'दबंग' सलमान खान आणि 'घातक' सनी देओल एकमेकांना भिडणार आहेत. दोघांमध्ये येत्या दिवाळीत घमासान होणार आहे.... घाबरू नका... हे घमासान रिअल लाइफमध्ये नाही तर रिल लाइफमध्ये होणार आहे. येत्या दिवाळीत सलमानचा 'प्रेम रतन धन पायो' आणि सनी देओलची 'घायल वन्स अगेन' हे चित्रपट रिलीज होणार आहे. 

Updated: Mar 23, 2015, 01:43 PM IST
 सलमान खान आणि सनी देओल भिडणार title=

मुंबई :  बॉलिवूडच्या 'दबंग' सलमान खान आणि 'घातक' सनी देओल एकमेकांना भिडणार आहेत. दोघांमध्ये येत्या दिवाळीत घमासान होणार आहे.... घाबरू नका... हे घमासान रिअल लाइफमध्ये नाही तर रिल लाइफमध्ये होणार आहे. येत्या दिवाळीत सलमानचा 'प्रेम रतन धन पायो' आणि सनी देओलची 'घायल वन्स अगेन' हे चित्रपट रिलीज होणार आहे. 

या पूर्वी असे झाले आहे की, दोन मोठे चित्रपट एकत्र रिलीज होतात त्यावेळी दोघांचे नुकसान होते. शाहरूख खानचा 'जब तक है जान' आणि अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार' हे चित्रपट एकत्र रिलीज झाले होते. त्यात शाहरूखचा जब तक है जानला नुकसान झाले होते. 

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण आपला चित्रपट रिलीज करण्यासाठी चढाओढ करीत असतात. या दोन्ही चित्रपटांत सलमान बाजी मारण्याची शक्यता आहे. सलमान आणि सूरज बडजात्या बऱ्याच वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसत आहेत. 

घायल वन्स अगेनमध्ये सनी देओल सोबत सोहा अली खान दिसणार आहे. सलमानसोबत 'प्रेम रतन धन पायो'मध्ये सोनम कपूर दिसणार आहे. त्यामुळे हे पाहायचे आहे की कोणाची होणार दिवाळी तर कोणाचे निघणार दिवाळं.... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.