विजयासह या भारतीय खेळाडूने केला अद्भूत विक्रम

आयपीएल-७ च्या फायनलमध्ये कोलकता नाइट रायडर्सने आपला दुसरा खिताब जिंकण्यात यश मिळविले. दोन आयपीएल जिंकण्याच्या यादीत केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरने चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीशी बरोबरी केली आहे. पण गंभीरच्या संघात असा एक खेळाडू आहे की त्याने या विजयामुळे एक अद्भूत विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोण आहे हा खेळाडू काय आहे हा विक्रम... पाहूया...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 2, 2014, 07:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
आयपीएल-७ च्या फायनलमध्ये कोलकता नाइट रायडर्सने आपला दुसरा खिताब जिंकण्यात यश मिळविले. दोन आयपीएल जिंकण्याच्या यादीत केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरने चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीशी बरोबरी केली आहे. पण गंभीरच्या संघात असा एक खेळाडू आहे की त्याने या विजयामुळे एक अद्भूत विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोण आहे हा खेळाडू काय आहे हा विक्रम... पाहूया...
हा खेळाडू आहे कोलकताचा धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाण... या आयपीएल विजयासह युसूफ पठाण आयपीएलचा सर्वाधिक खिताब जिंकणाऱा खेळाडू बनला आहे.
युसूफ पठाण २००८ सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स टीमचा सदस्य होता. या दरम्यान शेन वॉर्नच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानने आयपीएल चषक आपल्या नावावर केला होता. २०१२मध्ये युसूफ पठाण नाइट रायडर्स टीमचा हिस्सा होता त्यावेळी केकेआरने खिताब आपल्या नावावर केला होता. यंदाही केकेआरने खिताबावर आपले नाव कोरले. त्यामुळे युसूफ जिंकणाऱ्या टीमचा तिसऱ्यांदा सदस्य ठरला आहे.
युसूफने यावर्षी केवळ एक विक्रम आपल्या नावावर केला नाहीत, तर हैदराबाद विरूद्ध १६१चा पाठलाग करताना २२ चेंडूत ७२ धावा कुटल्या होत्या. त्यावेळी १५ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले होते. या खेळीत त्याने ७ षटकार आणि ५ चौकार लगावले होते. त्याच्या खेळीने केकेआरने चांगल्या रनरेटने दुसऱ्या स्थानावर धडक मारली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.