WI vs IND: टीम इंडियाच्या खेळाडूंची 'फुल ऑन मस्ती', जड्डू म्हणतो 'खींच मेरी फोटो...'
Team india in West Indies: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी खेळाडू वेस्ट इंडिजच्या सुंदर बीचवर सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.
टीम इंडियाचा पराभव करत वेस्ट इंडीजची मालिकेत बरोबरी
वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडीयाचा पराभव
IND vs WI : शेवटच्या टी२० मध्ये उमेश, जसप्रीत, कुलदीपला आराम
जाणून घ्या, कुणाला मिळालीय संधी
टीम इंडीयाचा वेस्ट इंडीजवर एक डाव आणि 272 धावांनी विजय
टीम इंडीयाचा वेस्ट इंडीजवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.
हा 'नो बॉल' ठरला 'नो बॉल ऑफ द सेच्युरी'
हा प्रकार वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घडला.
ख्रिस गेलचा संघर्षमय प्रवास, आईने शेंगा विकून वाढवले!
क्रिकेटमधील वादळ म्हणून ख्रिस गेलकडे पाहिले जाते. त्याची तुफान बॅटिंग क्रिकेटच्या मैदानावर वादळ निर्माण करते. त्याचा संघर्षमय प्रवास...
वेस्ट इंडिजच्या विजयानंतर सचिनने ब्रायन लाराला पाठवला खास SMS
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वेस्ट इंडिजच्या विजयानंतर ब्रायन लाराला एक खास एमएमएस केला आहे.
विंडीजच्या चंद्रपॉलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
ख्रिस गेलचे वादळ, ठोकल्या २१५ रन्स
फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.
अर्धवट राहिलेली सीरिज भारतानं २-१नं जिंकली!
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा ५९ धावांनी पराभव करीत मालिका २-१ नं जिंकली. पाहुण्या संघानं मालिकेतून माघार घेतल्यामुळं पाचवा सामना आता रद्द झाला आहे.
२०५ वनडे मॅच खेळून धोनी आठव्या क्रमांकावर!
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्यानं वेस्टइंडीज विरूद्ध सामन्यात टॉस करण्यासाठी मैदानात उतरल्याक्षणीच केला आहे. धोनी हा त्याच्या कारकीर्दीतली २५०वी वनडे मॅच खेळणारा भारतातील आठव्या क्रमांकाचा खेळाडू झाला असून या ठिकाणी पोहचणारा जगातील चौथा क्रमांकाचा विकेटकीपर झाला आहे.
मोहितला डच्चू; इशांतला संधी!
मुंबई : वेस्ट इंडिजसोबत असलेल्या पाच दिवसीय वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमचा गोलंदाज मोहित शर्मा याला डच्चू मिळालाय. त्याच्याऐवजी आता दिल्लीचा गोलंदाज इशांत शर्मा याला संधी मिळालीय. मोहित हा वनडे सिरीजमधून बाहेर झाला आहे. मोहित दुखापतीमुळे 'मायक्रोमॅक्स कप'मध्ये खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीय निवड समितीने मोहितच्या जागी इशांतला टीममध्ये घेतले आहे.
पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव
भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय.
काय घडलं होतं ‘त्या’ रात्री, सांगतोय अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ २००७ साली वर्ल्डकप दरम्यान वेस्ट इंडीजच्या समुद्र किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी त्याच्यावर खूप टीकाही झाली होती तसंच त्याला एका मॅचसाठी निलंबितही करण्यात आलं होतं. त्याच्यावर तेव्हा ही परिस्थिती का ओढावली होती, या प्रश्नाचं उत्तर फ्लिंटॉफनं आत्ता कथन केलंय.
वेस्ट इंडीज टेस्टसाठी भारतीय टीमची आज निवड
सचिनच्या निरोपाच्या मॅचसाठी आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. म्हणजेच वेस्ट इंडीज टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया आज निवडली जाईल. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत संदीप पाटील आणि कंपनीसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो बॉलर्सचाच.
शाहिद आफ्रिदीचा वन डेत वर्ल्ड रेकॉर्ड!
पाकिस्तानचा ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय सामन्यात काल नवा रेकॉर्ड बनवला. त्याने काल सुरूवातीला जोरदार फलंदाजी केली तर गोलंदाजी करताना ३५० पेक्षा अधिक विकेट घेतल्या. अशा प्रकारे कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे.
वेस्टइंडीजविरोधात टीमबरोबरच कोहलीची कसोटी
ट्राय सिरीज या तिरंगी मालिकेत टीम इंडियाची करो या मरोची स्थिती आहे. इंडिजबरोबरचा सामना जिंकून चालणार नाही तर मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. नाहीतर आपले सामान गुंडाळून मायदेशी परतावे लागेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विंडीज बॅट्समन रूनकोचा अपघाती मृत्यू
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर आणि बॅट्समन रूनको मोर्टोन याचा आज दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ३३ होते. त्रिनीदाद आणि टोबागोच्या मध्ये रूनको गाडी चालवत असताना त्याला हा अपघात झाला आहे.