www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटमधून निवृत्ती घेणं कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. मात्र निवृत्तीचा तो दिवस प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतोच. कधी निवृत्ती घेणं बातमी होते तर कधी वेळेवर निवृत्ती न घेणं सुद्धा... निवृत्तीच्या बातम्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंग चर्चेत आला होता. कारण त्यानं टेस्ट क्रिकेटला दोन वर्ष जास्त दिल्याची चर्चा आहे.
क्रिकेटचा हा लिजेंड पॉटिंग म्हणतो, "मी क्रिकेटला दोन वर्ष जास्त दिले." पॉटिंगच्या वक्तव्यावर विचार केला आणि त्याचे रेकॉर्ड पाहिले तर आपल्याला ही हे खरं वाटेल. त्यानं जर दोन वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली असती तर क्रिकेटच्या इतिहासात त्याचं वेगळं स्थान निर्माण झालं असतं. पॉटिंग म्हणाला होता की, 120-130 टेस्ट मॅच खेळल्यानंतर जर निवृत्ती घेतली असती तर आदर्श स्थिती निर्माण झाली असती.
जर असं झालं असतं तर?
> 120 टेस्ट नंतर - पॉटिंगच्या रन्सची सरासरी 58.50 असती, जी त्याला सर्वात चांगल्या सरासरीनं रन्स बनवणाऱ्यांमध्ये नवव्या स्थानावर नेलं असतं. सध्या रिकी 51.85 सरासरीनं 29 व्या स्थानावर आहे.
> टेस्ट रन्स बाबत बघितलं तर पॉटिंगनं 10,235 रन्स केले आहेत. या रन्सच्या हिशोबानं तो 11 व्या स्थानावर असता. मात्र सध्या 13, 378 रन्स करून तो दूसऱ्या स्थानावर आहे.
> निवृत्तीनंतर रिकी पॉटिंह टेस्ट शतकांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे (41 शतक) मात्र 120 टेस्ट मॅचनंतर जर त्यानं निवृत्ती घेतली असती, तर तेव्हाही तो तिसऱ्या स्थानावरच असता, मात्र संगकारा त्याच्या पुढे जावू शकला असता.
> कॅप्टन म्हणूनही तो एक चांगला निर्णय असता. कारण जर 120 मॅच नंतर पॉटिंग निवृत्त झाला असता तर 45 पैकी 33 मॅच जिंकवणारा तो कॅप्टन ठरला असता.
> कॅच घेण्याच्या बाबतीतही पॉटिंग 11व्या स्थानावर पोहोचला असता. आता कॅटिंग 196 कॅच घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.