मुंबई : भारताचा वनडे कप्तान महेंद्र सिंग धोनीने 'योग्य वेळ आली की निवृत्तीचा निर्णय घेईल' असं वक्तव्य केलं आहे.
विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटचा कप्तान करण्याची मागणी जोर धरत आहे. मागिल एक वर्षात धोनीची बॅट जास्त काही करू शकलेली नाही. भारतात होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्ड नंतर धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल अशी चर्चा आहे.
धोनीने म्हटलं की, 'मी असा व्यक्ती आहे जो वर्तमानात जगतो आणि वर्ल्ड कप टी-२० आधी ध्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. योग्य वेळ आल्यावर मी याबाबत निर्णय घेईल.'