क्रिकेटमध्ये 1009* धावांच्या रेकॉर्ड बोलला एमएस धोनी- 'हा काय विनोद नाही'

 आंतरशालेय स्पर्धेत १००९ धावांचा जागतिक विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडेचे भारतीय वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चांगले कौतुक केले आहे. 

Updated: Jan 6, 2016, 08:01 AM IST
क्रिकेटमध्ये 1009* धावांच्या रेकॉर्ड बोलला एमएस धोनी- 'हा काय विनोद नाही' title=

मुंबई :  आंतरशालेय स्पर्धेत १००९ धावांचा जागतिक विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडेचे भारतीय वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चांगले कौतुक केले आहे. 

मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या एच.टी.भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत, प्रणव धनावडेने नाबाद १००९ धावांची खेळी केली. प्रणववर जागतिक विक्रम केल्याने, चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

धोनी म्हणाला...
इतक्या धावा करणे हा विनोद नाही. वातावरण, मैदान आणि वय या बाबी लक्षात घेता प्रणवने खरोखर अतुलनीय कामगिरी केली आहे. तो एक खास मुलगा असून, ही दुर्मिळ खेळी आहे अशा शब्दात धोनीने प्रणवच्या कामगिरीचे कौतुक केले.

 

अजिंक्य म्हणाला...
अजिंक्यने प्रणवच्या खेळीचे विशाल असे वर्णन करुन एकदिवस तो भारतासाठी खेळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यक्तीगत नाबाद १००९ धावा करणे ही मोठी कामगिरी आहे. एकदिवस तो आमच्यासोबत खेळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता फक्त त्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष केंद्रीत करावे असे अजिंक्यने म्हटले आहे.

सचिन म्हणाला...
सचिनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जगात १००० धावा करणारा पहिला फलंदाज बनल्याबद्दल प्रणवचे अभिनंदन. यशाची आणखी शिखरे पादाक्रांत करायची आहेत.