www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट टीमचे निवडकर्ते आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी म्हणाले, जेव्हा टीमचं सिलेक्शन होतं तेव्हा जर त्यांच्या मुलाचं स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर चर्चा होत असेल तेव्हा मी बैठकीतून उठून जातो. इंग्रजी वृत्तपत्रासोबत केलेल्या बातचितमध्ये ते बोलत होते.
रॉजर बिन्नी म्हणाले, "त्यानं सर्वांना खोटं ठरवलंय. मी हे स्पष्ट करू इच्छितो की जेव्हा टीम सिलेक्शनबाबत स्टुअर्टचं नाव येतं. तेव्हा बैठकीतून बाहेर जातो. इतर 6 लोक त्यावर चर्चा करतात आणि निर्णय घेतात. निवडकर्त्यांव्यतिरिक्त कोच आणि कॅप्टन या प्रक्रियेचा भाग असतात. त्यांना स्टुअर्ट योग्य वाटला पण स्टुअर्टला आपली क्षमता सिद्ध करणं आवश्यक होतं, ते त्यानं करून दाखवलं."
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये स्टुअर्ट बिन्नीनं 6 विकेट घेऊन भारतीय टीमला शानदार विजय मिळवून दिला. स्टुअर्टला पहिल्या वन डेमध्ये जागा मिळाली नव्हती. मंगळवारी त्याला संधी दिली गेली आणि त्यानं त्याचं सोनं केलं. केवळ 58 रन्सवर बांग्लादेशची टीम ऑलआऊट झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.