जेव्हा सचिन भेटायला बोलावतो...

तुम्हाला सचिन तेंडुलकरचा फोन आला आणि त्यानं तुम्हाला भेटायला बोलावलं तर...कल्पना करा तुमची काय अवस्था होईल....अहमदनगरच्या चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या प्रमोद कांबळेंना असाच फोन आला आणि त्यांना सचिननं भेटायलाही बोलावलं... काय झाली असेल त्यांची अवस्था

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 17, 2012, 10:12 PM IST

www.24taas.com, अहमदनगर
तुम्हाला सचिन तेंडुलकरचा फोन आला आणि त्यानं तुम्हाला भेटायला बोलावलं तर...कल्पना करा तुमची काय अवस्था होईल....अहमदनगरच्या चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या प्रमोद कांबळेंना असाच फोन आला आणि त्यांना सचिननं भेटायलाही बोलावलं... काय झाली असेल त्यांची अवस्था....
सचिन तेंडुलकर.... क्रिकेटचा देव... आपल्या क्रिकेटप्रेमी देशात सचिनला ओळख नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत.... क्रिकेटचा हा बादशाह एवढा व्यस्त असतो की त्याला अनेकवेळा त्याच्या घरच्यांनाही वेळ देता येत नाही.... मात्र तुमच्या आमच्या सारख्या एखाद्या सामान्य माणसाला सचिनचा फोन आला तर..... होय, नगरच्या प्रमोद कांबळेंना चक्क सचिन तेंडुलकराचा फोन आला...समोरून सचिन तेंडुलकर बोलतोय असं म्हटल्यावर त्यांना काहीवेळी कुणीतरी आपली गंमत करतंय अशीच शंका आली.
सचिन फोन करुन फक्त थांबला नाही तर त्यानं त्यांना घरी येण्याचं आमंत्रणही दिलं. मग काय क्रिकेटच्या बादशाहाचं आमंत्रण म्हटल्यावर कांबेळ, कुटुंबासह दुस-याच दिवशी सचिनच्या वांद्र्यातल्या अलिशान बंगल्यावर पोहचले...सचिननं कांबळेंच्या शिल्पकला आणि चित्रकलेची तोंडभरुन स्तुती केली.. क्रिकेटच्या देवाला भेटल्यामुळं कांबळेंच्या आनंदाला पारावार उरली नव्हती. सचिनसोबत काढलेले फोटो, त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी घेऊन कांबळे नगरला परतले.