www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘आयपीएल-7’मध्य कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या युसुफ पठाननं आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात जलद गतीन हाफ सेन्चुरी ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दमदार बॅटींग करत युसुफनं आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय. युसुफनं केवळ 15 बॉल्समध्ये 50 धावा पूर्ण करत अॅडम गिलख्रिस्टचा रेकॉर्ड तोडलाय. युसुफनं 22 बॉल्समध्ये 5 चौकार आणि 7 सिक्सरसहीत 72 रन्स ठोकले.
आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सर्वात जलद गतीनं ठोकण्यात आलेली ही हाफ सेन्चुरी ठरली. याच जोरावर ही मॅच युसुफनं आपल्याकडे खेचून आणली.
युसुफला पहिल्याच बॉलवर जीवदान मिळालं होतं. अनिरुद्धनं युसुफचा कॅच सोडला आणि याचीच किंमत हैदराबादला चुकवावी लागली... पहिल्याच चार बॉल्सवर सिंगल घेतल्यानंतर युसुफनं बॉलर परवेज रसूलला ठोकण्यास सुरुवात केली. त्यानं रसूल आणि डेल स्टेन यांनी टाकलेल्या बॉल्सवर जोरदार शॉटस् खेळले. फोर-सिक्सची बरसात करत त्यानं बघता बघता आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
यापूर्वी हेच रेकॉर्ड गिलख्रिस्टच्या नावावर होतं. त्यानं 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादकडून खेळताना दिल्ली विरुद्ध 17 बॉल्समध्ये हाफ सेन्चुरी पूर्ण केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.