चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम जाहीर; गंभीरला डच्चू

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा आज मुंबई करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडिया जाहीर करण्यात आली.

Updated: May 4, 2013, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा आज मुंबई करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडिया जाहीर करण्यात आली... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्त्वाच्या सीरीजसाठी कोणाची निवड होते याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
१५ जणांच्या चमूमध्ये अनपेक्षितरित्या इरफान पठाणला संधी देण्यात आली आहे. तर गौतम गंभीरला डच्चू देण्यात आला आहे. तर दुसरीकडे वीरेंद्र सेहवागला पुन्हा एकदा टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तसेच युवीलाही संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आलेल्या या संघात जास्तीत यंगिस्तानवर भर देण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर टीम इंडिया नाव कोरणार का? याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
टीम इंडिया – महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन) रोहित शर्मा, विराट कोहली, मुरली विजय, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, शिखर धवन, सुरेश रैना, इरफान पठाण, दिनेश कार्तिक, उमेश यादव, विनयकुमार भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अमित मिश्रा