देवाला फूलं अर्पण करताना हे ध्यानात ठेवा!

हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या कर्म-कांडामध्ये फुलांचे विशेष महत्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती इत्यादी कार्य फुलांशिवाय अपूर्ण मानलं जातं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 17, 2013, 08:23 AM IST

www.24taas.com, मुंबई
हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या कर्म-कांडामध्ये फुलांचे विशेष महत्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती इत्यादी कार्य फुलांशिवाय अपूर्ण मानलं जातं.
तसं पाहायला गेले तर, देवाला कोणतेही फूल अर्पण केले जाऊ शकते. परंतू, काही फुलं अशी असतात जी देवाला विशेष प्रिय असतात. हे फुलं देवाला अर्पण करून कोणताही मनुष्य आपले नशीब बदलू शकतो.
कोणत्या देवाला कोणतं फूल वाहाल
गणेश : आचार भूषण ग्रंथानुसार श्रीगणेशाला तुलसीदल सोडून सर्व प्रकारचे फूल अर्पण करू शकता. या उपायाने श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
महादेव : महादेवाला धोत्र्याचे, कन्हेरीचं फूल अर्पण करावं.
विष्णू : विष्णूला कमळ, जूही, कर्दळ, केवड़ा, चमेली, अशोक, मालती, वासंती, चंपा, वैजयंती ही फूलं विशेष प्रिय आहेत.
श्रीकृष्ण : आपल्या प्रिय फुलांचे वर्णन करताना महाभारतात युधिष्ठिराला श्रीकृष्ण सांगतात की मला कुमुद, करवरी, चणक, मालती, नंदिक, पलाश व वनमालेची फूलं प्रिय आहेत.

सूर्यदेव : सूर्यदेवाला कमळ, चंपा, पालाश, अशोक झाडाची फूलं अर्पण करावीत.
पार्वती : महादेवाला आवडणारे फूल देवी पार्वतीला प्रिय आहेत. त्या व्यतिरिक्त बेल, पांढरे कमळ चंपा ही फूलं पार्वतीला अर्पण करावीत.
लक्ष्मी : लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय पुष्प कमळ आहे.