www.24taas.com, मुंबई
मुंबई विद्यापीठाने आखणी एक पाऊल पुढे टाकत परीक्षाचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. वाय. बी.कॉमच्या परीक्षा २१ मार्चपासून सुरु होत आहेत. त्यांना याचा लाभ होणार आहे. या ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा रविवारपासून सुरू करण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना हे प्रवेश पत्र मिळाले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी आपले नाव, आडनाव विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर टाईप केल्यानंतर ते कोठेही डाऊनलोड करता येतील, अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड झाल्यानंतर त्यावर फोटो लावून संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याची सही, आणि शिक्का घेणे आवश्यक राहील.
प्रवेशपत्रात काही चुका सुधारण्याचे अधिकारही पहिल्यांदाच महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. टी. वाय बी. कॉमच्या परीक्षा प्रवेश पत्राच्या ऑनलाईन सुविधानंतर विद्यापिठाकडून घेण्यात येणा-या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठीचेही प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.