www.24taas.com, मुंबई
हा प्रश्न खरंतर आज सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. जो तो आपआपल्या परीने उत्तरं शोधत असतो,बहुतेकदा शेजारी-पाजारी नातेवाइक फारफार तर एखादे वर्तमानपत्र ह्यांची मद्त सामान्य पालक व विद्यार्थी घेतात.
* करिअरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे
आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करिअरची दिशा दहावीनंतरच ठरवावी. ज्या प्रमाणे कोणत्याही गोष्टीचे नियोजन केल्याने ती गोष्ट जरी कमी असली तरी पुरते हा आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव असतो, तसेच करिअरचे नियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात.
* कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हे कसे ठरवावे ?
पालकांनी व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. बर्याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो.
1 सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
2 विद्यार्थ्याला कुठल्या विषयात करिअर करायचे आहे, हे समजून घ्या
3 मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे.
4 त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करिअरच्या पहिल्या पायरीवर डगमगतो.