www.24taas.com, मुंबई
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअर कुठल्या श्रेत्रात घडवायचं हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थांसमोर असतो. विद्यार्थांच्या मनातला गोंधळ दूर करण्यासाठी बॉर्न टू विन ही संस्था फ्युचर पाठशाला हा करिअर गाईडन्स आणि व्यक्तीमत्व विकास उपक्रम राबवते.
माध्यम प्रायोजक असलेल्या 'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर हे देखील याच संस्थेच्या जोश २०१२ च्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आणि आव्हांनाला कसे सामोरे जाण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं.
तसंच बॉर्न टू विन संस्थेचे संचालक अतुल राजोळी यांनी लिहलेल्या "माझा मोटिव्हेटर मित्र" या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जवळपास ३ हजार विद्यार्थी आणि पालकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.