www.24taas.com, मुंबई
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुंबईतल्या कॉलेज तरुणांना लागतात ते ‘मल्हार’चे वेध.. सेंट झेवियर्स कॉलेजमधील मल्हार फेस्टिव म्हणजे समस्त कॉलेज गोईंग युथच्या गळ्यातला ताईत..वेगवेगळ्या संकल्पना, कला, खेळ यांची पंढरी म्हणजे ‘मल्हार’… यावर्षीच्या मल्हारचेही शेड्यूल लवकरच जाहीर होईल.
मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये यंदा १७, १८ आणि १९ ऑगस्टदरम्यान ‘मल्हार’ सुरू होण्याची शक्यता आहे. यात स्ट्रीट डान्स, बॉलिवूड डान्स, लॅटीन बॉलरुम डान्स, यूवी लाईट डान्स, बॅन्ड शो अशा अनेक धमाकेदार युथफूल प्रोग्राम्सची मजा अनुभवायला मिळणार आहे.
डान्सबरोबरच सिंगिंगची स्पर्धाही ‘मल्हार’मध्ये आहे. सिंगिगची आवड असणाऱ्या तरुणांना रॉक बँड शोच्या माध्यमातून एक नवा फ्लॅटफॉर्म मिळतो. तसंच कव्वालीचा कार्यक्रमही सादर करणार आहेत. याचबरोबर पथ नाट्यंही सादर होणार आहेत. स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यात येते. कॉलेज तरुण म्हणजे फक्त मजा-मस्ती नसून सामाजिक भान असणारी जबाबदार शक्ती आहे हे या पथ नाट्यांमधून जाणवतं.
फाईन आर्ट्स डिपार्टमेंटही मागे नाही. यंदा मल्हारमध्ये शू पेंटींग आणि पाहायला मिळणार आहे. चार भिंतीमधील आयुष्य ही यंदाची थीम आहे.