www.24taas.com, नवी दिल्ली
नवे वर्ष येण्यास आणखी चार महिन्यांचा अवधी असला तरीही मोबाइल कंपन्यांनी दरवाढीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. 2013 च्या सुरुवातीला मोबाइल दरात 33 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
दिवसागणिक आता मोबाइलचा वापर वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत मोबाइल कंपन्यानी दरवाढीची तयारी सुरू केली आहे. लवकरच मोबाइलचे कॉल रेट ३३% दराने वाढणार आहेत.
कॅबिनेट मंत्रिमंडळ लवकरच स्पेक्ट्रमची मूळ किंमत निश्चित करणार आहे. यानंतर सर्व मोबाइल कॉल सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपन्या कॉल रेट वाढवणार आहेत. मोबाइल कॉलचे सरासरी दर ६० पैसे प्रतिमिनिट आहेत. पुढील वर्षी हे दर २० ते ३० पैशांनी महागणार आहेत. म्हणजेच पुढच्या वर्षी ग्राहकांना ८० ते ९० पैसे प्रति मिनिट या दराने बोलावं लागणार आहे.