www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
60-40 या मार्कसच्या क्रेडिट सिस्टिममुळे यंदा मुंबई विद्यापीठाच्या तिस-या वर्षाच्या परीक्षा उशीरा होण्याची शक्यता आहे, असं असतानाही या शैक्षणिक वर्षात हाच फॉर्मुला कायम राहिल असं विद्यापीठानं म्हटलंय.
मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून यात बदल होण्याची शक्यता आहे. 80/20 किंवा 75/25 हा नवा फॉर्म्युला विदयापीठाच्या विचाराधीन आहे. यासाठी विद्यापीठाने रिव्ह्यु कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे जर पुढच्या वर्षापासून नवा फॉर्म्युला लागू केल्यास सध्या पहिल्या आणि दुस-या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सिनेटमध्ये याबाबत चर्चा झाल्यानंतर त्यासंदर्भात रिव्ह्यू कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.