www.24taas.com, मुंबई
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आता ऑनलाईन निकालाच्या गुणपत्रिकाची प्रत देखील चालू शकणार आहे. त्यामुळे यंदा अकरावीला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे आठ-दहा दिवस वाचणार आहेत.
दहावी तसेच बारावी परीक्षांचा निकाल गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर ऑनलाईन मिळतो. त्यानंतर मूळ गुणपत्रिका ७ ते १0 दिवसानंतर विद्यार्थ्यांना संबधित शाळा, महाविद्यालयातून मिळते. मुळ गुणपत्रिका मिळाल्याशिवाय विद्यार्थी प्रवेश घेवू शकत नव्हते. यंदा मात्र विद्यार्थ्यांना मुळगुणपत्रिकेसाठी थांबावे लागणार नाही. कारण ऑनलाईन निकालाच्या गुणपत्रिकाची प्रत देखील अकरावी प्रवेशाला ग्राह्य धरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर मिळालेल्या गुणपत्रिकेच्या आधारे देण्याचा सूचना निकालानंतर देण्यात येतील. तसेच त्या पध्दतीने शाळा महाविद्यालयांनी कायवाही करावी, अशी पत्रे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातून पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान, दहावीला विज्ञान विषयात कमी कमी ४0 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे तरच अकरावीला विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांला प्रवेश मिळेल. या नियमांचे उल्लघन केल्यास संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाची उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मान्यताच रद्द करु शकते, असा इशाराही शिक्षण उपसंचालकांनी दिला आहे.
प्रवेशासाठी ठळक बाबी
. ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी त्या गुणपत्रिकेवरील आपले गुण टाकून प्रवेश घेवू शकणार आहेत.
. अंतिम प्रवेश देताना मूळ गुणपत्रिका पाहिल्या जातील.
. मूळ गुणपत्रिका शाळेत मिळाल्यानंतर जे विद्यार्थी अर्ज भरतील त्या विद्यार्थ्यांना मात्र एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुण प्रवेशाच्या संकेतस्थळावर आपोआप येतील. त्यावेळी विद्यार्थ्यांना आपला बैठक क्रमांक टाकण्याच्या सूचना देण्यात येतील.
. अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्ज स्विकारणार्या केंद्रावरही संकेतस्थळावरील गुणपत्रिका घेण्यात येणार आहेत.