मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटनं अनेक रेकॉर्ड केले आहेत. क्रितकेटमधील ही रनमशिन आपल्या करिअरच्या अत्युच्च शिखरावर आहे. आपल्य़ा क्रिकेट करिअरमध्ये त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
सचिन तेंडुलकर ज्या-ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर उतरतो त्यावेळी तो कुठला ना कुठला नविन रेकॉर्ड होतो. क्रिकेटच्या या दैवताचं गेल्या दोन दशकांपासून क्रिकेटविश्वावरच अधिराज्य कायम आहे. त्यानं शानदार बॅटिंग करत बॅटिंगमधील जवळपास सारेच रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये त्याच्या नावावर निरनिराळे रेकॉर्डस आहेत.
1. 1994 - अर्जुन पुरस्कार
2. 1997-98 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
3. 1997 -विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर
4. 1999 - पद्मश्री
5. 2001-महाराष्ट्र भूषण
6. 2003 - वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट
7. 2005 - राजीव गांधी पुरस्कार
8. 2008 - पद्म विभूषण
9. 2009 - मादाम तुसॉंदमध्ये मेणाचा पुतळा
10. 2010 -ICC क्रिकेटर ऑफ द इयर
11. 2010 - पीपल्स चॉईस पुरस्कार (एशियन अवॉर्ड)
12. 2010 - इंडियन एअर फोर्समध्ये ग्रुप कॅप्टन
जबरदस्त बॅटिंगने फार थोड्या कालावधीत आपल्या भोवती वेगळ वलय निर्माण केल्यानंतर सचिनला 1994 मध्ये क्रीडा क्षेत्रातील असामन्य कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यानंतर 1997-98 मध्ये राजीव गांधी खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्य़ाला मिळाला. 1997 मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरही तो ठरला. 1999 मध्ये त्याला पद्मश्री या भारताच्या चौथ्या सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार त्याला मिळाला. 2003