सचिनने अखेर 'महाशतक' करून दाखवलं

सचिनने अखेर करून दाखवले, हो सचिनने करूनच दाखवले, अनेक दिवसांपासून भारतातील क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आज आला. सचिनने अखेर महाशतक केले. गेल्या ३३ इनिंगच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सचिनने आज बांग्लादेश विरूद्ध महाशतक ठोकले..

Updated: Mar 16, 2012, 08:22 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

सचिनने अखेर करून दाखवले, हो सचिनने करूनच दाखवले, अनेक दिवसांपासून भारतातील क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आज आला. सचिनने अखेर महाशतक केले. गेल्या ३३ इनिंगच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सचिनने आज बांग्लादेश विरूद्ध महाशतक ठोकले.. 'महाशतक' आजवर कोणीही न गाठलेला एक पल्ला सचिनने गाठला... महाशतकांच्या शतकवीराला झी २४ तास कडून मानाचा मुजरा!!!!

 

सचिनने बांग्लादेशविरूद्ध शतक ठोकत सगळ्यांचा डोळ्याचे पारणे फेडले, सचिन आज शतक करणार की नाही याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. वनडे आणि टेस्ट मिळून सचिनने १०० शतकांचा असा पल्ला गाठला. शतकांचा शतकवीर अशी बिरूदावली आज त्याला खऱ्या अर्थाने शोभते आहे. गेले वर्षभर तो एकही शतक करू शकला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती मात्र आज त्याने आपल्या बॅटने सगळ्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे..

 

सचिन तेंडुलकरने आजवर अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले मात्र महाशतकाचा विश्वविक्रम त्याला गेले वर्षभर हुलकावणी देत होता. गेल्या वर्षी खेळलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात त्याने द. आफ्रिकेविरूद्ध शतक केलं होतं ते त्याचं ९९वं शतक होतं. १२ मार्च २०११ला सचिनने शेवटची सेंच्युरी केली होती.

 

सचिनने आज अगदी सथंपणे खेळाला सुरवात केली. गंभीर झटपट आऊट झाल्याने सचिनने आपल्या फटक्याना आवर घालत आपला खेळ हळूहळू पुढे नेला, त्याने गेल्या २० वर्षाचा अनुभव पणाला लावीत आपली शंभरावी सेंच्युरी पूर्ण केली. त्याने १३८ बॉलमध्ये १०० रन केले. पण त्यानंतरही त्याने आपला खेळ पुढे चालूच ठेवला. तो ११४ रन करून परतला, त्यात १२ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता....  १०० शतकं करून त्याने त्याच्या करोडो चाहत्यांची मनोकामना पूर्ण केली.