www.24taas.com, रायगड
उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूरच्या काळ्या कमाईच्या पर्दाफाश झाला आहे. या लाचखोर अधिकाऱ्याने काळ्या कमाईतून तब्बल ३७६ कोटींचं साम्राज्य उभं केलंय. लाचलुचपत विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर हा धक्कादायक खुलासा झालाय. ३० हजार रुपये मासिक पगार कमावणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती आली कुठून?
अवैध मार्गाने तब्बल ३७६ कोटींची माया जमविणाऱ्या या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरांवर छापा टाकून लाचलुचपत विभागाने या काळ्या संपत्तीच्या कुबेराचा खरा चेहरा उघड केलाय. ठाकूरने विविध कंपन्यात तब्बल २५८ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं पोलीसांच्या तपासात उघड झालं आहे.
नितीश ठाकूरनं ही काळी माया आपल्या २० वर्षाच्या सरकारी नोकरी दरम्यान जमा केली आहे. लाचलुचपत विभागाच्या तब्बल १७५ अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात हा धक्कादायक खुलासा झालाय. उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या नितीश ठाकूरकडे मिळालेली संपत्ती पुढील प्रमाणे आहे.
* लँड रोव्हर, ऑडी, बीएमडब्ल्यू, होंडा सीव्हीआर या सारख्या तब्बल १० आलिशान कार्स
* मुंबई, अलीबाग परिसरात तब्बल ६० कोटी ५० लाखांची घरं, फार्महाऊसेस, दुकानं
* २० लाखांची इंपोर्टेड घड्याळं
* इंपोर्टेड शूजचे ११ जोड, एक जोड ३५ हजारांचा
* एकूण १०० तोळं सोनं, किंमत २ कोटी ७७ लाख २ हजार रु.
* ८ कोटींचे फिक्स डिपॉझिट
एवढंच नाही, तर नितीश ठाकूरच्या घरातून तब्बल ११ इलेक्ट्रॉनिक लॉकर्स पोलीसांनी जप्त केले आहेत. या लॉकर्समध्ये कोट्यावधींची काळी माया दडवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे.
एकूणच नितीश ठाकूरने आपल्या उत्पन्नापेक्षा तब्बल ६० हजार पटीने जास्त संपत्ती जमा केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे. लाचलुचपत विभागाने नितीश ठाकूर, त्याची पत्नी मिनल, भाऊ निलेश आणि आई छाया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचं गांभीर्य पाहता न्यायालयाने नितीश ठाकूरला २२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. एकूणच जसजसा तपास पुढे झालीय नितीश ठाकूरची इतरही काळी कमाई समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढे
लोकसेवक नितीश ठाकुर हा मुरुड तालुक्यातील चिखल पाखाडी येथील रहिवासी असून त्याने उपविभागीय पदापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे जे.जे हॉस्पीटल मुंबई येथे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून १९९३ ते २००५ या कालावधीत लोकसेवक म्हणून काम केलं. स्वतःच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करत कायदेशीर उत्पन्नापेक्षा ११८ कोटी ३९ लाख २२ हजार ८१६ रुपये अधिक माया जमविली आणि ही काळी माया त्याच्या उत्पन्नापेक्षा ६५,८६७ टक्के इतकी जास्त आहे.तसेच कोणताही कायदेशीर करार न करता सुमारे २५८ कोटी ८८ लाख इतकी मोठी रक्कम विविध कंपन्यामध्ये गुंतवली असून त्यावर इन्कम टॅक्सनेही हरकत घेतली आहे. बंधु निलेश ठाकुर यांच्या घर झडतीमध्ये मोठ्या रकमेचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू मिळाल्या आहेत.
*चिखल पाखाडी येथे वडिलोपार्जित घर... किंमत दीड कोटी
*सोमेश्वर वैभववाडी इमारतीत कोट्यवधीचे चार आलिशान फ्लॅट
*पुजा अपार्टमेंट-दोन दुकान गाळे
* श्रुती सारंग अपार्टमेंट- पाच दुकान गाळे
*वंदना अपार्टमेंट- १ दुकानगाळा १ फ्लॅट
*ठाकुरवाडीमध्ये एक आलिशान बंगला
*बेळखडे येथे एक फार्महॉऊस
*चिखली येथे एक फार्महॉऊस
*कोळगाव येथे शेकडो एकर जमीन
*गोटेघर येथ फार्महाऊस आणि बाग
*कांदिवलीतील व्हाईसरॉय कोर्टमध्ये पहिल्या माळ्यावर फ्लॅट
*सनसिटी बिल्डींगमध्ये एक फ्लॅट
*समतानगरमध्ये प्रकल्प कार्यालय
*बोरीवलीमधील वझिरा नाका परिसरातील योगानंद सोसायटीमध्ये
एक फ्लॅट
*विलेपार्लेमधील स्वप्नशिल्प बिल्डींगमध्ये बी विंगमध्ये फ्लॅट
ए विंगमध्ये तिस-या माळ्यावर फ्लॅट
पुढे
*अंधेरीमध्ये इस्टदेव सदनमध्ये