कैद्यांची तुरुंगातील बडदास्त !

..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !

Updated: Jun 4, 2012, 10:32 PM IST

www.24taas.com, मुंबई/नाशिक

 

सात निष्पाप नागरिकांना आपल्या आलिशान कार खाली चिरडून ठार करणा-या ऍलिस्टर परेराला कोर्टाने तीन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय..पण परेराचा नाशिकच्या तुरुंगात राजेशाही थाट असल्याचं झी 24 तासनं उघड केल्यानंतर तुरुंगातील सत्य जगासमोर आले..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !

 

गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला व्हावी म्हणून तुरुंग उभारण्यात आलेत...पण या उद्देशालाच तिलांजली देण्याचा प्रयत्न केला जातोय...ऍलिस्टर परेरा सारख्या कैद्यांना घरच्याप्रमाणे सुविधा पुरवल्या जाताहेत...ही बाब चित्रफितीत कैद झालीय...खरं तर त्याला कोर्टानं सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली असतांना, त्याची राजेशाही बडदास्त ठेवली जातेय...

 

काय आहेत अलिशान बाबी..

 

नाशिक तुरुंगात कायदा धाब्यावर

तुरुंगात कैद्याची आलिशान बडदास्त

कैद्याने भागवली कार चालविण्याची हौस

 

चित्रफितीत दिसत असलेला हा आहे ऍलेस्टर परेरा ... नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात तो तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगतोय...पण इतर कैद्याप्रमाणे त्याला इथं वागणूक दिली जात नाही...तर एखाद्या पाहुण्याप्रमाणे त्याची नाशिक तुरुंगात बडदास्त ठेवली जातेय...तुरुंगात शिक्षा भोगणा-या ऍलेस्टर परेराला चक्क आपली आलिशान कार चालविण्याची मुभा देण्यात आल्याचं या चित्रफितीतून उघड झाले आहे.

 

तरूंगातील चित्रफीत बघितल्यानंतर नाशिकच्या तुरुंगात एलिस्टर परेररा सारख्या धनदांडग्यांना राजेशाही वागणूक दिली जातेय हे वेगळं सांगण्याची गरज आता राहिली नाही... झी 24तासने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गृहखात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ऍलिस्टरच्या या कारनाम्यांची आणि पर्यायानं नाशिक तुरुंगातील बेकायदा कारभाराची डीआयजी मार्फत चौकशी सुरू झाली आहे.

 

एकीकडं या प्रकरणाची चौकशी सुरु झालीय तर दुसरीकडं ऍलिस्टर परेराचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे... एका कुख्यात गुंडाने ऍलिस्टर विरोधात तक्रार दाखल केली होती...ती तक्रार झी 24 तासच्या हाती लागलीए.   गेल्या मार्च महिन्यात एका कैद्यानं जिल्हा न्यायदंडाधिका-यांकडे जेल प्रशासनाची तक्रार केलीय.सुप्रीम कोर्टानं सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली असताना ऍलिस्टरला टेलरिंगचं काम देण्यात आलयं....पण ते कामही तो करत नसून एका गोडावूनच्या रखवालीचं काम तो करत असल्याचं तक्रारीत नमुद करण्यात आलंयय...ऍलिस्टर परेरा तुरुंगातील एका क्लार्कच्या मदतीनं कॉम्प्युटर रुममध्ये बसून असतो... तसेच तो तासनतास मोबाईलवर बोलत असल्याचं तक्रारदारानं म्हटलं. ऍलिस्टरसाठी दररोज खास जेवणाचा डबाही तुरुंगा बाहेरुन येत असल्याची तक्रार जिल्हा न्यायदंडाधिका-याकडे करण्यात आलीय...परेराने जो गुन्हा केलाय त्याला तो अंगावार काटा आणणारा आहे.

 

12 नोव्हेंबर  2006.

पहाटे 3 वाजून 45 मिनिटं.

ठिकाण कार्टर रोड वांद्रे.

 

दक्षिण मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये पार्टी आटोपून निघालेल्या ऍलिस्टर परेरानं दारुच्या नशेत वांद्र्यातल्या कार्टर रोडच्या फुटपाथवर झोपलेल्या 15 जणांना उडवलं होतं... त्यामध्ये 7 जण जागीच ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले होते...याप्रकरणी ऍलेस्टर परेरा