जो राखे 'उत्तरप्रदेश'... ओ राखे 'भारत देश'..

समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग यादव यानीही यावेळेला सत्ता आणायचीच याच हेतूने प्रचारयंत्रणा राबवली. स्टार प्रचारक म्हणुन अखिलेश यादव यांच्या रॅली सभानी समाजवादी पक्षाला पुन्हा संजीवनी लाभलीय.

Updated: Mar 6, 2012, 12:14 AM IST

www.24taas.com

 

उत्तरप्रदेशचा कौल कुणाच्या बाजुने ?

मुलायमची सायकल जिंकणार का सत्तेची शर्यत ?

जखडला जाणार का माय़ावतींचा हत्ती  ?

कामी येणार का राहुलचा करिष्मा ?

 यु.पी.चं महाभारत

 

 

 

समाजवादी पक्षाची काय आहे किमया???

 

समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग यादव यानीही यावेळेला सत्ता आणायचीच याच हेतूने प्रचारयंत्रणा राबवली. स्टार प्रचारक म्हणुन अखिलेश यादव यांच्या रॅली सभानी समाजवादी पक्षाला पुन्हा संजीवनी लाभलीय. पण या निमित्ताने जर समाजवादी पक्षाची सत्ता आली तर अखिलेश यादवच्या रुपाने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक नवा चेहरा मिळणार आहे.

 


२०१२  च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून  ते मतमोजणी होईपर्य़ंत उत्तरप्रदेशचं  राजकिय चित्र विलक्षण झपाट्याने बदललं गेल. आणि म्हणूनच उत्तर प्रदेशच्या सत्तेचा प्रबळ दावेदार म्हणून समाजवादी पक्षाकडे पाहिलं जातं.२००७ च्या निवडणुकीत युपीची सत्ता बसपाकडे गेली अन ९८ जागांवर सपाला समाधान मानावं लागलं होतं. य़ावेळी मात्र बदललेल्या समिकरणांचा फायदा घेत बसपाच्य़ा हत्तीला अंकूश लावायचाच याच इराद्यानं समाजवादी पार्टी रिंगणात उतरल्याचं चित्र दिसतं. मुलायमसिंग यांना गेली पाच वर्ष सत्तेबाहेर राहणं आणि मायावतीचं राजकारण पाहणं याच्याशिवाय कुठलाच पर्याय नव्हता. पण मतदानोत्तर चाचणीतून सपाला बहुमत आणि त्रिशूंक अवस्था असे पर्याय समोर येत असल्याने समाजवादी पक्षाच्या भुमिकेकडे विशेशत्वाने लक्ष दिलं जातं.

 

या निवडणुकीत समाजवादी पक्षाला यश मिळाल्यास मुस्लीम मतांचा पर्याय म्हणून मुलायमसिंग याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होईल आणि त्याचवेळी  पारंपारिक मुस्लीम मत खेचणारा पक्ष ही ओळख कॉंग्रेसला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरेल. यावेळच्या प्रचारात समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव हे खऱ्या अर्थाने स्टार प्रचारक राहिले. भाजपचे गडकरी, कॉंग्रेसचे राहूल गांधी यांच्या तुलनेत अखिलेशची मतदारांवर छाप जास्त पडली. त्याचा करिष्मा पक्षाला तारणार का हे जरी निकालानंतरच स्पष्ट होणार असले तरी राहूल गांधी विरुद्ध अखिलेश यादव अशी स्पर्धा रंगली.

 

अर्थात समाजवादी पक्ष जर हि निवडणूक जिंकला तर अखिलेश यादव यांच्या रुपाने राहूल गांधीना एक नवा तरुण विरोधक पाहाय ला मिळणार आहे. सत्ता आल्यास अखिलेश मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असली तरी मुलायमसिंगच्या यांच्यावरच शेवटचा निर्णय अवलंबून असेल.. पण असं असलं तरी, मतदारानी जर समाजवादी पार्टीला नाकारलं तर कॉंग्रेसच्या मदतीला धावण हा एकच पर्याय उरतो आणि जर असं झाल्यास २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसा ठी समाजवादी पार्टीची वाटचाल ही फार खडतर असणार आहे.

 

 

 

राहुल गांधी उत्तरप्रदेशात मिळवणार का सत्ता -

 

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल जसा देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा असेल तसाच तो कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याही राजकीय वाटचालीची दिशा ठरवणारा असेल. उत्तर प्रदेशात मरगळलेल्या काँग्रेसला नवजीव