'तो' अपघात टाळता आला असता...

प्रशासनाचा दिरंगई मुळे जुलै महिन्यात मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेचा दुर्दैवी अपघात झाल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. या घटनेत एका व्यक्तीचा मुत्यू झाला तर 8 गंभीर जखमी झाले होते.

Updated: Aug 2, 2012, 11:19 AM IST

दिनेश मौर्या, www.24taas.com, मुंबई

 

प्रशासनाचा दिरंगई मुळे जुलै महिन्यात मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेचा दुर्दैवी अपघात झाल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. या घटनेत एका व्यक्तीचा मुत्यू झाला तर 8 गंभीर जखमी झाले होते..आरटीआईने मिळालेल्या माहितीने ही माहिती समोर आलीय...

 

तारीख- 19 जुलै 2012

 

ठिकाण- मुंबईच्या वडाळा परिसरात

 

घटना-  इस्टर्न फ्री वेचा ब्रिज कोसळला..

 

या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर इर्स्टन फ्री वेचा काम करणा-या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला...पण ही दुदैवी घटना टाळता आली असती. हा खुलासा झालाय माहितीचा अधिकारातून मिळालेल्या माहितीने..

 

आरटीआय नुसार इर्स्टन फ्री वेचं काम 8 जानेवरी 2008 ला सुरु झालं होतं आणि जानेवारी 2011 मध्ये ईर्स्टन फ्री वेच काम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली. पण काम सुरु होऊनही तब्बल साडे तीन वर्षानंतरही ईर्स्टन फ्रीवे तयार झाला नाही. जर जानेवारी 2011 ह्या डेडलाईनलाच हा पूर्व मुक्त मार्ग तयार झाला असता तर ही दुर्दैवी घटना झालीच नसती..

 

 

डेडलाईन संपूनही दिड वर्ष उलटलं पण अजूनही हा पुर्व मुक्त मार्ग तयार झाला नाही. उलट हा फ्री वे तयार करण्यासाठी आधी ठरवण्यात आलेला 531 कोटींचं बजेट आता चक्क 41 कोटीने वाढलाय...इतकच नव्हेतर पुर्व मुक्त मार्ग तयार करण्याची डेडलाईनही वाढवून आता डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे...

 

एमएमआरडीएने दावा केलाय कि, पी.डीमेलो रोड येथील बांधकामाचे निष्कासन व पुनर्वसन, कस्टम व मिठाघर जमीनीचा ताबा मिळविण्यासाठी झालेला विलंब आणि उच्च दाबाच्या भूमिगत वाहिणी हलविण्यासाठी झालेला विलंब ह्या कारणांमुळे पुर्व मुक्त मार्ग वेळेवर तयार होऊ शकला नाही...

पण कंत्राट देण्याआधीच ह्या अडचणी का दूर केल्या नाहीत? जाणूनबूजून एमएमआरडीएने इथे दुर्लक्ष केलं का असा सवाल आरटीआय कार्यकर्ते यांनी केलाय. एकूणच, प्रशासनाचा दिरंगईमुळे ही घटना झाली हे मात्र नक्की.