नक्षलवाद का झाला रक्तरंजित?

गडचिरोतील पुस्टोलात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटामुळं प्रशासन पुरतं हादरुन गेलंय...लाल क्रांतीचा नार देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे...गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांकडून केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..

Updated: Mar 30, 2012, 04:05 PM IST

www.24taas.comमुंबई/गडचिरोली

 

 

सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करुन नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा आपल्या आस्तित्वाची जाणीव करुन दिलीय...गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत...पण खरंच हे नक्षलवादी गरिबांचे कैवारी आहेत का ? सशस्त्र क्रांतीचं जे स्वप्न ते आदिवासींना दाखवित आहेत ते सत्यात येणार आहे का ? ज्या उद्देशातून ही चळवळ उभा राहिली होती तो उद्देश साध्य झाला आहे का ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, रक्तरंजित नक्षलवादमध्ये!

 

 

 

गडचिरोलीतल्या पुस्टोला गावात नक्षलवाद्यांनी भू-सुरुंग लावून केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना घेऊन जाणारी बस स्फोटात उडवली..हा स्फोट घडवून आणण्यासाठी त्यांनी खास  रणनिती आखली होती. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय राखील दलाच्या जवानांना टार्गेट केलं...नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांची मिनीबस भू-सूरुंग स्फोट घडवून उडवलीय..

 

 

 काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना गडचिरोली  जिल्हातील धोनोरा तालुक्यात पुस्टोला गावाजवळ मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडलीय.... रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा आणि छिन्नविछिन्न झालेली मिनीबसची अवस्था या वरुन त्या स्फोटाच्या तिव्रतेची कल्पना तिथ मदतीसाठी पोहोचलेल्या जवानांना आली होती...नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 12 जवान शहीद तर 28 जवान गंभीर जखमी झालेत....नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलावर भीषण  हल्ला करुन पुन्हा एकदा दहशत निर्माण केलीय ..सीव्हीक एक्शन प्लॅन अंतर्गत नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यासाठी  केंद्रीय राखीव दलाचे  जवान तीन वहानातून धोनरा तालुक्यातील पट्टा गावाकडं निघाले होते...पण ते सामान त्या ग्रामस्तांपर्यंत पोहोचलेच नाही... पुस्टोल गावाजवळ  दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी भू-सूरुंग स्फोट घडवून ती बस उडवून दिली... नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून हे कृत्य केलं आहे...गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी  पुस्टोला गावाजवळच्या एका जंगलात  दडून बसल्याचं बोललं जातंय़...केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती...त्यासाठी ते योग्यसंधीच्या शोधात होते.

 

 

भू-सूरुंगाचा स्फोट घडवून आणण्यासाठी त्यांनी पुस्टोला गावाची निवड केली होती....सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी पुस्टोलागावा जवळच्या कन्हेलीच्या  जंगलात आश्रय घेतला होता.. ज्या ठिकाणी भू-सूरुंगाचा स्फोट घडवून आणला त्या ठिकाणापासून काही अंतरावरच हे नक्षलवादी दबा धरुन बसलेहोते...नक्षलवाद्यांनी आपल्या या षडयंत्राची खबर कोणालाच लागू दिली नाही....केंद्रीय राखीव दलाचे जवान एकाच बसमधून गट्टा गावाकडं जात असल्याचीमाहिती नक्षलवाद्यांना मिळाली होती...मंगळवारी सकाळी केंद्रीय राखीव जवानंची बस पुस्टोला गावा येताच नक्षलवाद्यांनी भू-सूरुंगाचा स्फोट घडवूनआणला....या घटनेपूर्वी नक्षलवादी आसपासच्या गावात येवून गेल्याची चर्चा आहे.

 

 

नक्षलवाद्यांकडून सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय राखील दलाच्या जवानांवर हल्ले केले जात आहे..गेल्या काही वर्षात या हल्ल्यांच प्रमाण वाढलंय....नक्षलवाद्यांच्या या बदलेल्या रणनितीचा हा आढावा.

 

 

गडचिरोतील पुस्टोलात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटामुळं प्रशासन पुरतं हादरुन गेलंय...लाल क्रांतीचा नार देणा-या नक्षलवादाचा काळाकुट्ट  चेहरा समोर आला आहे...गेल्या काही वर्षात  नक्षलवाद्यांकडून  केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना टार्गेट करण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.....जंगल प्रदेश