प्रियंका मराठीत म्हणते.. अहो सचिनराव.....

'अहो सचिनराव तुम्हांला चेंडू मारताना बघते मला काही तरी होतं'.... असं म्हणत प्रियंकाने अस्सल मराठी तडका दाखवला. प्रियंका म्हणाली की, सचिनची बॅटींग ही १०० टक्के सुख देणारी असते. त्यामुळे कुछ कुछ होता है.

Updated: Mar 29, 2012, 02:56 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई इंडियन्सचे ओनर निता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी सचिन तेंडुलकरच्या महासेंच्युरीचं महासेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमध्ये क्रिकेटपटूपासूंन ते पॉलिटीशियन्सपर्यंत सारेचजण सहभागी झाले होते.

 

 

प्रियंका म्हणते अहो सचिनराव तुम्हांला पाहून काही तरी होतं...

 

सचिनचे कौतुक करताना प्रियंका चोप्राने चक्क सचिनचं मराठीत कौतुक केलं.... 'अहो सचिनराव तुम्हांला चेंडू मारताना बघते मला काही तरी होतं'.... असं म्हणत प्रियंकाने अस्सल मराठी तडका दाखवला. प्रियंका म्हणाली की,  सचिनची  बॅटींग ही १०० टक्के सुख देणारी असते. त्यामुळे कुछ कुछ होता है. तसचं अंजली उद्देशून देखील म्हणाली अंजली तुम्हे पता नही मुझे कुछ कुछ होता है.

 

 

सचिनसाठी लतादीदींचं तू जहाँ जहाँ...

 

सचिन तेंडुलकरनं गानसम्राज्ञी लतादीदींना गाण्याची मागणी केली आणि त्यांनी त्याची मागणी मान्यही केली. सचिनचं कौतुक कोण नाही करत, सगळेच करतात आजतर संपूर्ण जग त्याचं कौतुक करतात. याचाच मला अभिमान आहे. सचिनने ज्या दिवशी मला आईचा दर्जा दिला तेव्हाच मी धन्य झाले. असं खुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सांगितलं तर सचिनने त्यांना 'तु जहाँ जहाँ' या गाण्याची फर्माइश करताच ती देखील त्यांनी पूर्ण केली.

 

आमिरने या आधीच १०० शतकांची मागणी केली होती...

 

सचिनचा बॉलिवूडमधला खास मित्र म्हणजे आमिर खान याने देखील सचिनचं कौतुक तर केलचं, मात्र त्याच सोबत लहानपणाच्या गोष्टी सांगून साऱ्याच श्रोत्यांना सचिनच्या लहानपणाकडे घेऊन गेला. जेव्हा त्याचे ५० शतकं झाली तेव्हाच १०० शतकांसाठी मी गळ घातली होती. असं सचिनचं कौतुक त्याने केलं, 'खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को कर बुलंद इतना, हर तकदीर से पहिले खुदा बंदेसे खुद पुछे बता तेरी रजा क्या है... असं म्हणतं सचिनला शुभेच्छा दिल्या.

 

सल्लू म्हणतो सचिनचा तुझा रेकॉर्ड कोण मोडणार?? 

 

बॉलीवूड स्टार्सही या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये होते. बॉलीवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खाननं आपल्या दंबग स्टाईलमध्ये आपला महासेंच्युरीचा रेकॉर्ड कोणी मोडलेला आवडेल हे सचिनकडून वदवूनही घेतलं. रेकॉर्ड बनतात ते तुटण्यासाठी, मी आमिरचा रेकॉर्ड हा गेले अनेक वर्ष तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. असं म्हणतं त्याने आमिरलाही कोपरखळी मारली आहे. सचिनही सलमानच्या ह्या फटकेबाजीवर मनमोकळेपणाने हसला...

 

त्यामुळे सचिनच्या ह्या महाशतकाचं सेलिब्रेशन हे नक्कीच खास असचं होतं त्यामुळे सचिनस