राज्यात टोलचा 'झोल'!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोल विरोधात रणशिंग फुंकलं आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटले...पण नेमकं काय आहे टोलचं गौडबंगाल ? खर्च वसूल होऊनही का केली जातेय टोल वसुली ? जनतेच्या मानगुटीवरुन कधी उतरणार टोलचं भूत ? कुणाचं उखळ पांढरं करण्यासाठी चालवले जातायत टोल ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात घोळत आहेत.. टोलच्या उद्देशापासून ते त्याच्या अर्थकारणापर्यंतचा वेध घेतला आहे. टोलचा 'झोल'! मधून.

Updated: Jun 13, 2012, 10:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोल विरोधात रणशिंग फुंकलं आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटले...पण नेमकं काय आहे टोलचं गौडबंगाल ? खर्च वसूल होऊनही का केली जातेय टोल वसुली ? जनतेच्या मानगुटीवरुन कधी उतरणार टोलचं भूत ? कुणाचं उखळ पांढरं करण्यासाठी चालवले जातायत टोल ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात घोळत आहेत.. टोलच्या उद्देशापासून ते त्याच्या अर्थकारणापर्यंतचा वेध घेतला आहे. टोलचा 'झोल'! मधून.

 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आंदोलन करण्याची घोषणा करताच राज्यभरात मनसैनिकांनी टोल नाक्यांना लक्ष्य केलं...मनसेच्या या आंदोलनामुळे टोलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. आणि राज्यभरातल्या टोलवरुन आवाज खळ ख्ट्याक. मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मनसैनिकांनी राज्याभरातील टोलनाक्यांना लक्ष्य केले.

 

 

मुंबईच्या दहिसर परिसरातील टोलनाक्यापासून त्याची सुरुवात झाली.... मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल होतं.. दहिसरमधील आंदोलनाचं लोण राज्यभर पसरलं...खालापूरजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मनसेनं आंदोलन केले. आंदोलकांनी खालापूर टोलनाक्यावर टोलवसूली बंद केली. तसेच मुंबई- अहमदाबाद हायवेवरील खानिवडे टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडला. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड टोलनाक्यावर मनसौनिकांनी तोडफोड केली आहे.

 

 

नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या ओढा परिसरातील टोलनाकाही मनसैनिकांनी बंद पाडलाय. अहमदनगर जिल्हातील शिर्डीतही मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. कोपरगाव संगमनेर रोडवर असलेल्या टोलविरोधी आंदोलन करण्यात आलं.. रांजणगाव देशमुख जवळील टोलनाका मनसैनिकांनी बंद पाडला.. टोलविरोधी आंदोलनाचे पडसाद मराठवाड्यातही उमटलेत.

 

औरंगाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांची तोडफोड केलीय. मनसैनिकांनी हरसूल सावंगी टोलनाक्याची तोडफोड केलीय. तसेच सिल्लोड मार्गावरील टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. राज्यात ठिकठिकाणी मनसैनिकांकडून आंदोलन केलं जातं आहे..पण मनसेच्या या आंदोलनानंतर खरंच टोलचा प्रश्न सुटणार आहे का ? असा सवाल केला जातोय.

 

टोल विषयी जनतेच्या मनात नाराजी असून त्यामागचं कारणही तसं आहे..आज ठिकठिकाणी टोलनाके उभे राहिले असून जनता निमुटपणे टोल भरत आहेत...पण तो टोल त्यांना आणखी किती वर्ष भरावा लागणार आहे ? कंपनीने आता पर्यंत किती टोल वसूल केला? याची कोणतीच माहिती दिली जात नाही.

 

मनसेच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा टोलचा मुद्दा चर्चेत आलाय....खरं तर टोल वसुलीविरोधात जनतेच्या मनात असंतोष खदखदत असून त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.. त्यामुळेच यापूर्वीही स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी टोलविरोधी आंदोलनं झाली आहेत...पण आता मनसेनं हा मुद्दा हाती घेतल्यामुळे टोलनाक्यांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली.

 

टोल विरोधात वातावरण तयार झालं असलं तरी थेट टोलला विरोध करुन चालणार नाही...कारण राज्यात पायाभुत सेवा-सुविधा निर्माण करण्यासाठी बीओटी अर्थात बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वाचा अवलंब करण्यात आला आहे...पण त्यामध्ये सुसुत्रता तसेच पारदर्शकत नसल्यामुळे टोलविषयी संशयाचं धुकं गडद होत चाललंय...राज्यात शिवसेना- भाजप युतीची सत्ता असताना टोल वसुलीच्या अधिकाराचा लिलाव करुन त्यातून पैसा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला..बीओटी तत्वार रस्ते विकासाला चालणा देण्यात आलीय.... युतीची सत्ता गेल्यानंतर का